विवाहितेचा विनयभंग, आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST2021-09-09T04:13:15+5:302021-09-09T04:13:15+5:30
खापा : रस्त्याने जात असलेल्या विवाहित महिलेला अडवून आराेपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. ही घटना खापा ...

विवाहितेचा विनयभंग, आराेपी अटकेत
खापा : रस्त्याने जात असलेल्या विवाहित महिलेला अडवून आराेपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन वस्ती परिसरात नुकतीच घडली. पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.
पुंडलिक कलनसिंग परतेकी (५५, रा. नवीन वस्ती, खापा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पीडित महिला आपल्या आईच्या घरून ती राहत असलेल्या घराकडे जात असताना राेडवर आराेपीने तिला अडविले. तिला माझ्या खाेलीवर चल असे म्हणत शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ) (२) अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार अजय मानकर करीत आहेत.