विवाहितेची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:10 IST2021-03-13T04:10:55+5:302021-03-13T04:10:55+5:30

----------- महिलेचा मृत्यू, पती जखमी नागपूर : अमरावती रोडवर झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर पती जखमी आहे. बुधवारी ...

Marital harassment | विवाहितेची छेडखानी

विवाहितेची छेडखानी

-----------

महिलेचा मृत्यू, पती जखमी

नागपूर : अमरावती रोडवर झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर पती जखमी आहे. बुधवारी रात्री शिवाजी दिवटे (६०) रा. पारशिवनी हे पत्नी पुष्पा (४५) सोबत बाइकने जात होते. खडगाव टी-पाॅइंटजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या बाइकला धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. रुग्णालयात पोहोचल्यावर पुष्पाचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

------------

सत्र न्यायालय परिसरात चोरी

नागपूर : सत्र न्यायालय परिसरात ८.७३ लाख रुपये किमतीचे लिफ्टचे साहित्य चोरीला गेले. याप्रकरणी सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिसरात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या लिफ्टचे साहित्य परिसरात ठेवले होते. ५ ऑगस्ट २०२० रोजी आरोपींनी हे साहित्य चोरून नेले. सदर पोलिसांना चोरीची सूचना देण्यात आली. चौकशीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Marital harassment