शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मार्डचा कामबंद आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:56 AM

Mard, doctors, strike, Nagpur News कोरोनाचा संसर्ग झाल्याने परीक्षेला बसू न शकलेल्या एका निवासी डॉक्टरची पुन्हा परीक्षा घेण्यास महाराष्ट् आरोग्य विज्ञान विद्यापीठ टाळटाळ करीत असल्यावरून निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला.

ठळक मुद्देकोरोनाबाधित निवासी डॉक्टरची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग झाल्याने परीक्षेला बसू न शकलेल्या एका निवासी डॉक्टरची पुन्हा परीक्षा घेण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ टाळटाळ करीत असल्यावरून निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. तसे पत्र मेडिकलच्या अधिष्ठात्यांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले.‘मार्ड’नुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अस्थिव्यंगोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) घेत असलेले निवासी डॉक्टर रोहित गर्ग यांची ७ सप्टेंबर रोजी ‘पीजी’ची प्रॅक्टिकलची परीक्षा होती. परंतु ६ सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. याची माहिती मेडिकलच्या अधिष्ठात्यांना देण्यात आली. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना याबाबत कळविले. महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही याची माहिती देण्यात आली. कोरोनाबाधित असल्याने डॉ. गर्ग यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येर्ईल, असे आश्वासन देण्यात आले. १५ सप्टेंबर रोजी डॉ. गर्ग यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे विद्यापीठाला पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. परंतु विद्यापीठाने न्यायालयात जाण्यास सांगितले. यामुळे मार्डने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.या संदर्भात विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, या विद्यार्थ्याची परीक्षा घेणे शक्य नाही. आज कोरोना आहे, पुढील वर्षी आणखी कुठल्यातरी आजाराने विद्यार्थी आजारी पडतील आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा दबाव आणतील. यामुळे न्यायालयाने आदेश दिले तरच परीक्षा घेणे शक्य आहे.आश्वासन पाळायला हवेमार्डचे अध्यक्ष डॉ. अर्पित धकाते यांनी ‘लोकमत’ला सांगितले, निवासी डॉक्टर २४ तास कोरोनाबाधितांना सेवा देत आहेत. अशावेळी त्यांना कोरोनाची लागण होऊन परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी कोरोनाच्या या काळात विशेष बाब म्हणून परीक्षा घेणे आवश्यक आहे. मागील १५ दिवसांपासून आम्ही मागणी विनंती करीत आहोत, परंतु कोणी लक्ष देत नसल्याने नाईलाजाने आंदोलनाचा इशारा द्यावा लागला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप