मार्च एण्ड तोंडावर, सीएंची सेवा बंद कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:47+5:302021-03-14T04:09:47+5:30

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु चार्टर्ड अकाउंटंटच्या सेवेचा अत्यावश्यक ...

March and face to face, how to stop the service of CA? | मार्च एण्ड तोंडावर, सीएंची सेवा बंद कशी ?

मार्च एण्ड तोंडावर, सीएंची सेवा बंद कशी ?

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु चार्टर्ड अकाउंटंटच्या सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, या मागणीचे निवेदन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या नागपूर शाखेने पालकमंत्री नितीन राऊत यांना सादर केले.

संघटनेचे अध्यक्ष साकेत बगडिया यांनी सांगितले की, आयकर भरण्याची अखेरची तारीख १५ मार्च आणि जीएसटीआर ३ बी रिटर्ननुसार कर भरण्याची तारीख २० मार्च आहे. सर्व व्यावसायिकांसाठी वर्षाच्या अंतिम व्यवहारांची तपासणी आणि योजना आखण्यासाठी ३१ मार्च २०२१ पूर्वी नियोजन करणे गरजेचे असते. या सर्व व्यवहारांमुळे शासनाला महसूल मिळतो. सीए अग्रीम कर, रिटर्न फायलिंग आणि जीएसटी भरण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देतात. लॉकडाऊनमुळे या आर्थिक घडामोडी होणार नाहीत. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंटला आर्थिक सेवा देण्याची परवानगी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष जुल्फेश शहा, जितेन सगलानी, संजय अग्रवाल, सुरेन दुरुगकर, अ‍ॅड. मनोज मोरयानी उपस्थित होते.

................

Web Title: March and face to face, how to stop the service of CA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.