शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मराठवाडा, खानदेशाच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:53 IST

पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात ३६८ मृत्यूनागपूर विभागात ६७५ हजार मृत्यूचा आकडा गाठायला लागले १६२ दिवस

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्यात वाढलेल्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. यात गुरुवारी मृत्यूची संख्या हजारावर गेली. परंतु पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे. २० ऑगस्टपर्यंत खानदेशात १८५५, मराठवाड्यात १३२० तर विदर्भात १०४३ मृतांची नोंद झाली. विदर्भात मृतांची ही संख्या गाठायला १६२ दिवस लागले.विदर्भात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारावर रुग्णांची भर तर ३० ते ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहे. या जिल्ह्यात ७०० ते १००० दरम्यान रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे, तर २५ ते ४० दरम्यान रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गुरुवारी या जिल्ह्याची रुग्णसंख्या १७,७२२ तर मृतांची संख्या ६२५वर गेली. याच्या निम्मेही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद विदर्भाच्या इतर जिल्ह्यात झालेली नाही. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आहेत. येथील रुग्णांची संख्या ४,१६१ आहे. असे असले तरी नागपूरनंतर सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात १४१ मृत्यूची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात मृतांची संख्या १०० आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ५०च्या आत मृतांची संख्या आहे. सर्वात कमी मृत्यूची नोंद गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे आतापर्यंत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.- सर्वाधिक मृत्यू मुंबई विभागातआरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाअंतर्गत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर येथे गुरुवारपर्यंत एकूण १२,०९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू याच विभागात आहेत. पुणे विभागातील कोल्हापुर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ५,१४१ मृत्यूची नोंद झाली. नाशिक विभाग म्हणजे, खानदेशातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात १८५५ रुग्णांचे मृत्यू झाले. औरंगाबाद विभाग म्हणजे, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात १३२० तर विदर्भातील नागपूर विभागात ६७५ व अमरावती विभागात ३६८असे एकूण १०४३ मृत्यू झाले आहेत.-विदर्भात अशी वाढली मृत्यूसंख्याविदर्भात पहिल्या मृत्यूची नोंंद मार्च महिन्यात बुुलडाणा जिल्ह्यात झाली. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९ तर २० ऑगस्टपर्यंत ६५६ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच विदर्भात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.९२ टक्के आहे. यात साधारण ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्य ५० ते ९० या वयोगटात झाले आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस