संघभूमीत मराठ्यांचा नि:शब्द हुंकार
By Admin | Updated: October 26, 2016 02:55 IST2016-10-26T02:55:38+5:302016-10-26T02:55:38+5:30
राज्याच्या विविध जिल्ह्यातून निघालेल्या मराठा मोर्चांचा हुंकार नागपुरातही पोहचला.

संघभूमीत मराठ्यांचा नि:शब्द हुंकार
रेशीमबाग ते कस्तूरचंद पार्क मूक मोर्चा
नागपूर : राज्याच्या विविध जिल्ह्यातून निघालेल्या मराठा मोर्चांचा हुंकार नागपुरातही पोहचला. सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराच्या शेजारीच असलेल्या रेशीमबाग मैदानावरून मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. नि:शब्द हुंकार देत, हातात डौलाने भगवे फडकवत, तोंडावर अन् दंडावर काळी पट्टी बांधून कोपर्डीच्या घटनेचा निषेध नोंदवत तब्बल चार तासांनी कस्तूरचंद पार्कवर मोर्चाचा समारोप झाला. समाजातील महिला आणि युवतींच्या हाती मोर्चाचे नेतृत्व सोपवून मराठ्यांचा जनसागर शिस्तबद्धरीत्या रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले.