शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाची उद्योजक म्हणून ओळख निर्माण व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:48 IST

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाजाला नवी ओळख मिळावी, यासाठी मराठा बिझनेसमन फोरम कार्यरत आहे.

ठळक मुद्देमराठा बिझनेसमन फोरमची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाजाला नवी ओळख मिळावी, यासाठी मराठा बिझनेसमन फोरम कार्यरत आहे.रविभवनात शनिवारी फोरमद्वारे मराठा समाजातील नवीन उद्योजक आणि स्वत:चा व्यवसाय असलेल्या उद्योजकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजीव देशमुख, दीपक देशमुख, भानसिंग मोहिते, समीर जाधव, फोरमचे अध्यक्ष शशिकांत पवार, कार्याध्यक्ष अरुण पवार, राजेंद्र सावंत, अभिषेक सावंत, मनोहर कबले, वीरेंद्र पवार उपस्थित होते. फोरमने महाराष्ट्र आणि हैदराबाद व बंगळुरू येथे २२ चॅप्टर तयार करण्यात आले आहे. मराठा समाजातील व्यावसायिकांचे एक नेटवर्क तयार करायचे आहे. नवीन उद्योजकाला मार्गदर्शन व पाठबळ मिळवून देण्याचा फोरमचा उद्देश आहे. तसेच मराठा समाजात बोटावर मोजण्याइतके उद्योजक असले तरी, त्यांची ओळख समाजाला नाही, अशा उद्योजकांची माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येते. २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या फोरममध्ये उद्योजक कसे घडविता येतील, समाजाला रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील. नवनवीन व्यावसायिक मॉडेलची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली असल्याची माहिती वीरेंद्र पवार यांनी दिली.

टॅग्स :marathaमराठाnagpurनागपूर