शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच, ते दोन समाजांना झुंजवत ठेवतायत: फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:06 IST

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका करत आगामी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं आहे.

नागपूर : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मराठा आरक्षणावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा राहिलेला आहे, असा घणाघात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच आरक्षणाच्या आंदोलनाची राजकीय चिंता करण्याची आवश्यकता नाही. या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, या आंदोलनांचा सामाजिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

शरद पवारांवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मोठमोठी आंदोलने सुरू आहेत. मात्र आपण मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येतं की, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही आपण सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य ऐकलं होतं की मराठा आरक्षणापेक्षाही राज्यात इतर मोठे प्रश्न आहेत. शरद पवारांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना कधी मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना दोन समाजांना झुंजवत ठेवायचं होतं. लोकं झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल, असं त्यांचं राजकारण आहे."

उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आरक्षण प्रश्नावरून टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. "आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण आपण हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टातही आपलं सरकार असेपर्यंत हे आरक्षण टिकलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तर मंडल आयोगालाही विरोध केला होता. तुम्ही मंडल आयोगाला विरोध केल्यामुळेच छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि आता तुम्ही तोंड वर करून बोलताय," असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, "मराठा आरक्षण देण्यासाठी आपली कमिटमेंट पक्की आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. मात्र हे आरक्षण देताना आपण ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही," अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabhaलोकसभाSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण