मराठेकडे कोट्यवधीची मालमत्ता

By Admin | Updated: June 15, 2015 02:57 IST2015-06-15T02:57:31+5:302015-06-15T02:57:31+5:30

माजी मंत्री छगन भूजबळ आणि त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक ....

Maratha property worth billiards | मराठेकडे कोट्यवधीची मालमत्ता

मराठेकडे कोट्यवधीची मालमत्ता

एसीबीने घेतली सदनिकेची झडती : रोख, दागिने आढळले
नागपूर : माजी मंत्री छगन भूजबळ आणि त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केलेले बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव देवदत्त गंगाधर मराठे यांच्या स्थानिक सदनिकेत एसीबीच्या पथकाने झडती घेतली. या झडतीत रोख, दागिने आणि कागदपत्रांसह १ कोटींची मालमत्ता एसीबीच्या पथकाला गवसली.
११ जूनला एसीबीने छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह एकूण १७ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यात तत्कालीन बांधकाम मंत्रालयातील सचिव देवदत्त मराठे यांचाही समावेश आहे. मराठे नागपूरशी संबंधित असून, त्यांची येथील शिवाजीनगरातील सिमेंट रोडवर सदनिका आहे. या सदनिकेत शुक्रवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने झाडाझडती घेतली. एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या माहितीनुसार, या झडतीत मराठे यांच्या नागपूरसह तीन ठिकाणी सदनिका, अंदाजे ३५ लाखांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रोख तसेच ठिकठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे आढळली. त्यावरून मराठे यांची मालमत्ता सुमारे १ कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जैन यांनी व्यक्त केला. या झडती कारवाईचा अहवाल एसीबीच्या मुंबई मुख्यालयात पाठविण्यात आला असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Maratha property worth billiards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.