१६० रुपयाच्या नकाशासाठी लागणार ६,८०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:50+5:302020-12-25T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार महापालिकेच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून देण्यात येणारे ...

A map of Rs 160 will cost Rs 6,800 | १६० रुपयाच्या नकाशासाठी लागणार ६,८०० रुपये

१६० रुपयाच्या नकाशासाठी लागणार ६,८०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार महापालिकेच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून देण्यात येणारे भाग नकाशे व झोन दाखल्यासाठी आकारानुसार शुल्क आकारले जाते. यात वाढ केली आहे. आधी ज्या नकाशासाठी ३० ते १६० रुपये रुपये शुल्क आकारले जात होते, त्यासाठी आता ७०० ते ६,८०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. सोबतच नोंदणी उताऱ्याच्या प्रतीसाठी जादा शुल्क लागेल. महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती सावरण्याला यातून मदत होण्याची आशा आहे. मात्र कोरोना संकटामुळे आर्थिक संकट असताना नगर रचना विभागाच्या शुल्कवाढीचा बोजा शहरातील नागरिकांना सोसावा लागणार आहे.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून नकाशे, झोन नकाशे पुरविण्यावर शुल्क आकारले जाते. यात वाढ करण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला आहे. नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१(१)अन्वये, शासन अधिसूचना १ मार्च २००१ पासून अंमलात आली आहे. नासुप्रच्या क्षेत्रांतर्गतच्या सात योजना वगळून उर्वरित नागपूर शहराकरिता महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले होते. तथापि, ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार नागपूर शहरासाठी महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे.

...

ऑनलाईन भाग नकाशे प्रक्रिया तूर्त बंद

भाग नकाशे झोन दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्याची प्रक्रिया सध्या महापालिकेकडून केल्या जात नाही. यासंदर्भातील धोरण भविष्यात ठरविले जाणार आहे.

..

असे आहेत जुने व वाढीव शुल्क

नकाशा, दाखला विद्यमान दर वाढीव दर ( कलर प्रत-रुपयात)

नकाशा पूर्ण आकार २० बाय ३० सें.मी. ६० ७००

नकाशा ४५ बाय ६० सें.मी. ८० ११००

नकाशा ६० बाय ९० सें.मी. १२० २५००

नकाशा ७५ बाय १०५ सें.मी. १६० ६,८००

भूखंड दर्शविणारा भाग नकाशा ५० ७००

मूळ भूखंडाचा भाग नकाशा ८० १५००

दोनपेक्षा अधिक भूखंडाचा भाग नकाशा १४० २,५००

मंजूर नगर रचना योजनेतील सनदेची प्रत ४० ८००

भूखंडाच्या नोंदी उतारा प्रत ३० २००

सर्व्हे नं., गट नं. प्रमाणपत्र प्रत ३० ३००

नकाशाची सिडी (१ जी.बी.)०० ५००

Web Title: A map of Rs 160 will cost Rs 6,800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.