शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जिल्ह्यात रस्त्यावरील पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले

By निशांत वानखेडे | Updated: July 20, 2024 18:24 IST

Nagpur : अतिवृष्टीमुळे साेयाबीन पिक, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

निशांत वानखेडे

नागपूर : शहरासाेबत नागपूर जिल्ह्यातही शनिवारी मुसळधार पावसाने झाेडपले. काही तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल जलमय झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक गावे पाण्याने वेढल्या गेल्याची माहिती आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे साेयाबीन पिक, कपाशी, भाजीपाला आदी पिकांची पाण्याच्या लाेंढ्याने खरडली गेल्याने माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. संततधारेमुळे धानाचे राेवणेही खाेळंबले.

  • नागपूर ते आंभोरा मार्गावरील माळणी येथील नाल्यावरील, तसेच कुही ते मांढळ दरम्यान चिपडी नाल्यावरील पूरामुळे आंभाेराकडील वाहतूक काही काळ बंद.
  • कुही उमरेड रोड वरील आपतुर पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली.
  • कामठी अंतर्गत बागडोर नाल्याला पूर आल्याने येरखेडा ,भाजी मंडी, बुनकर कॉलनी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले.
  • हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या पुरात ५ मजूर अडकले. धानोली येथून वागदराकडे येतांना नाला ओलांडून वेणा नदीकडे येत असतांना मधात हे मजूर सापडले. एकीकडे नाला व दुसरीकडे वेणा नदी आणि मधोमध हे मजूर, अशी परिस्थिती हाेती.
  • भिवापूर : शुक्रवारी रात्री १२ वाजतापासून सततधार पाऊस. नक्षी गट ग्रामपंचायती अंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावाला जोडणा-या मार्गावरील नाल्यावर देखील पुराचे पाणी आल्यामुळे गावाचा ग्रामपंचायतीशी आणि तालुकास्थळाशी संपर्क तुटला. जवळी-नांद राज्य मार्गही बंद.
  • अतिवृष्टीमुळे भिवापूर तालुक्यात नदी-नाल्या लगतच्या शेतातील कपाशी, साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

नांद धरणाचे सातही दरवाजे उघडलेमुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यात नांद धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सकाळी आवश्यकतेप्रमाणे धरणाचे ७ दरवाजे ३५ से.मी. ने उघडुन धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी कुटूंबीयांची व इतर नागरीकांची, मालाची व जनावरांची योग्य खबरदारी घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कुणीही नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

तीन तालुक्यातील आजचा पाऊसभिवापूर तालुका : आज सरासरी पाऊस ९६.४० मि.मी. १ जून ते २० जुलैपर्यंत ४१६.३६ मि.मी.माैदा तालुका : आज सरासरी ४७.३६ मि.मी. १ जून ते २० जुलैपर्यंत ४८९.८८ मि.मी.रामटेक तालुका : आजची सरासरी १४०.८ मि.मी. १ जून ते २० जुलैपर्यंत ४५२.१७ मि.मी.

 

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस