शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१७ आणि १८ डिसेंबरला नागपूर-वर्धा मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द!

By नरेश डोंगरे | Updated: December 13, 2024 23:30 IST

दोन दिवस राहणार ब्लॉक : सिंदी रेल्वे स्थानकावर यार्ड रीमॉडेलिंग

- नरेश डोंगरे

नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील नागपूर वर्धा सेक्शनमध्ये असलेल्या सिंदी रेल्वे स्थानकावर लाँगहॉल लूपसह थर्ड आणि फोर्थ लाईनच्या संबंधाने यार्ड रिमॉडेलिंग आणि ईलेक्ट्रीक इंटरलॉकिंग केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी १७ आणि १८ डिसेंबरला ब्लॉक करण्यात येणार आहे. परिणामी या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या परावर्तित मार्गाने चालविल्या जाणार आहे. काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. लांब अंतराच्या अनेक गाड्या उशिरा धावणार आहेत. यामुळे उपरोक्त दोन दिवस लाखो प्रवाशांची गैरसोय होण्याचे संकेत आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यागाडी क्रमांक ०१३७३ वर्धा - नागपूर मेमू, गाडी क्रमांक ०१३७४ नागपूर वर्धा मेमू, गाडी क्र . ०१३७१ अमरावती - वर्धा मेमू, ०१३७२ वर्धा-अमरावती मेमू, १११२१ भुसावळ - वर्धा एक्स्प्रेस, १११२२ वर्धा -भुसावळ एक्स्प्रेस, १२११९ अमरावती - अजनी एक्स्प्रेस, १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२११९ अमरावती - जबलपूर एक्स्प्रेस या सर्व गाड्या १८ डिसेंबरला रद्द करण्यात आल्या आहेत.

शॉर्ट टर्मिनेशन ओरिजिनेशन केलेल्या ट्रेनगाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर - गोंदिया एक्स्प्रेस १७ डिसेंबर रोजी वर्धा रेल्वे स्थानकांवर थांबेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ११०४० गोंदिया कोल्हापूर एक्स्प्रेस १८ डिसेंबरला गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटण्याऐवजी वर्धा रेल्वे स्थानकावरून दुपारी ११:५९ वाजता सुटेल.

उशिरा धावणाऱ्या गाड्यागाडी क्रमांक ०५२९३ मुजफ्फरपूर - सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ डिसेंबरला आपल्या निर्धारित वेळेत सुटण्याऐवजी १ तास ३५ मिनिटे उशिरा धावेल. १२६२१ चेन्नई नवी दिल्ली एक्स्प्रेस याच दिवशी १.३० तास उशिरा, तर २०८०५ विशाखापट्टनम नवी दिल्ली एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा १.१५ तास विलंबाने धावेल. १२६२२ नवी दिल्ली चेन्नई एक्स्प्रेस १७ डिसेंबरला १.१० तास विलंबाने, तर १२६९१ बंगळुरू हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ४५ मिनिटे उशिरा धावेल. १२८१० हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा ३० मिनिटे, १२७२३ हैदराबाद न्यू दिल्ली एक्स्प्रेस ३० मिनिटे, १८०३० कोलकाता शालीमार एलटीटी एक्स्प्रेस १५ मिनिटे, २२९०६ कोलकाता शालीमार ओखा एक्स्प्रेस १० मिनिटे, १२९७० जयपूर कोईम्बतूर एक्स्प्रेस १० मिनिटे, १२८४३ पूरी अहमदाबाद एक्स्प्रेस १० मिनिटे, २२६७० पाटना एर्नाकुलम एक्स्प्रेस १० मिनिटे, १२५१२ कोचुवेली गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी १० मिनिटे, तर ०११३९ नागपूर मडगाव एक्स्प्रेस (१८ डिसेंबरला) १० मिनिटे उशिरा धावेल.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर