शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकखाली बोगदा तयार झाल्याने अनेक गाड्या रद्द; काहींचे मार्ग वळविले, काही मध्येच थांबवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 23:34 IST

प्रवाशांना तीव्र मनस्ताप; मुर्तीजापूर - माना रेल्वे मार्गावर ६२९/२८ क्रमांकाच्या पोलजवळ जोरदार पावसाने रेल्वे ट्रॅक पोखरला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी सायंकाळी माना ते कुरुमदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या खाली पाण्याच्या प्रवाहामुळे बोगदा तयार झाल्याने नागपूर -मुंबई तसेच नागपूर - पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पुर्णपणे प्रभावित झाली आहे. या मार्गावरून गाडी चालविणे शक्य नसल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काहींना जागच्या जागीच थांबविण्यात आले आहे. तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहे.

मुर्तीजापूर - माना रेल्वे मार्गावर ६२९/२८ क्रमांकाच्या पोलजवळ जोरदार पावसाने रेल्वे ट्रॅक पोखरला. खालचा भाग एखाद्या बोगद्यासारखा झाला आणि मोठ्या नाल्यातून वाहावे तसे पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅक खालून जोरदार प्रवाहाने वाहू लागले. त्यामुळे भुसावळ डिव्हीजनमधील अप आणि डाऊनच्या रेल्वेगाड्यांचा सायंकाळी ६.५० नंतर खोळंबा झाला. नागपूर अमरावती मुंबई, पुरी-सुरत एक्सप्रेस, नागपूर - पुणे एक्सप्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, भुसावळ-वर्धा मेमू यासह अनेक रेल्वेगाड्या प्रभावित झाल्याने काही गाड्या बडनेरा रेल्वेस्थानकावर तर काही मुर्तीजापूरच्या पुढे थांबविण्यात आल्या. काही गाड्यांचे रिशेड्युलिंग करण्यात आले. सिकंदराबाद एक्सप्रेस अकोला-नांदेड मार्गे वळविण्यात आली. या एकूणच प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लगला.

रेल्वे प्रशासनाची दिलगिरीनिर्माण झालेल्या या स्थितीला पुर्वपदावर आणण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात असून, यामुळे रेल्वे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRainपाऊस