विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: September 20, 2015 03:04 IST2015-09-20T03:04:41+5:302015-09-20T03:04:41+5:30

गणेशोत्सवासोबतच कमी दिवसाच्या मूर्ती विसर्जनालाही सुरुवात झाली आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

The mantra system is ready for immersion | विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज

विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज


नागपूर : गणेशोत्सवासोबतच कमी दिवसाच्या मूर्ती विसर्जनालाही सुरुवात झाली आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पाठोपाठ तीन व पाच दिवसांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. परंतु यावेळी गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब म्हणजे विसर्जनासाठी तलावावर जावे लागणार नाही. शहराच्या विविध भागात तसेच तलावाच्या किनाऱ्यावर ११८ ठिकाणी कृ त्रिम तळे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील ५४ तळे तयार झाले आहेत.
विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी मोठे ड्रम व टाक्या उपलब्ध आहे. मनपाच्या झोन स्तरावरील गणेशोत्सवाची जबाबदारी सहायक आयुक्त यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये खाली जागेत खड्डे खोदून त्यात ताडपत्री टाकून तळ्याचे स्वरूप देऊ न त्यात पाणी टाकून कृत्रिम तळे निर्माण करण्याच काम सुरू आहे. कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, यासाठी गणेशभक्तांना प्रवृत्त केले जात आहे.
कृत्रिम तळ्यातील मूर्ती दुसऱ्या दिवशी बाहेर काढून प्रशासनातर्फे मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात येणार आहे.
तलावाच्या काठावर कृत्रिम तळ्याची व्यवस्था केली जात आहे. ज्या झोनमध्ये तलाव नाही अशा प्रभागात कृत्रिम तळ्यांची संख्या अधिक राहणार आहे.
मागील काही वर्षापासून मनपातर्फे तलाव स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. परंतु मूर्ती विसर्जनामुळे तलावातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच तलावात गाळ साचतो. त्यामुळे मागील तीन वर्षापासून कृत्रिम तळे निर्माण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु अनेक भाविक मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन न करता तलावात विसर्जन करतात.
मनपाच्या वतीने नैसर्गिक जलस्रोतावर व तलावाच्या ठिकाणी सेवाभावी संस्थांच्या मदतीने जलप्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यात सेवाभावी संस्था व कनक रिर्सोेसेस लि. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विसर्जन व्यवस्थेत ग्रीन व्हिजील फाऊं डेशनचे कौस्तुव चॅटर्जी, वृक्ष संवर्धन समितीचे प्रा. विजय घुगे व आर.बी. देशपांडे, रोटरी क्लबचे राज शाह, सृष्टी पर्यावरण मंडळाचे दिनेश नायडू, प्रशांत पट्टीवार, बाबा शेंडे, प्रशांत राजुरकर, अराध्या पांडे, कनक रिर्सोसेसचे कमलेश शर्मा, वैद्यकीय अधिकारी अनिकेत झा व डॉ. प्रदीप दासरवार, अन्न निरीक्षक सुधीर फटिंग यांच्यासह विभागीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The mantra system is ready for immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.