मनपात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

By Admin | Updated: May 2, 2017 01:43 IST2017-05-02T01:43:29+5:302017-05-02T01:43:29+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Mantap will hoist the flag at the hands of the mayor | मनपात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

मनपात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्वीन मुदगल, माजी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, डॉ. आर. झेड. सिद्दिकी, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, वनिता दांडेकर, भारती बुंदे, विशाखा बांते, जयश्री रारोकर, शिल्पा धोटे, रूपाली ठाकूर, मनीषा धावडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे, महेश तालेवार, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, सहायक आयुक्त महेश धामेचा, गणेश राठोड, राजेश कराडे, सुवर्णा दखने, स्मिता काळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन दल पथकासह विभागीय प्रशिक्षण केंद्राच्या पथकाने संचलन केले. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mantap will hoist the flag at the hands of the mayor