मनोज भिसेला दहा वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST2021-07-14T04:10:54+5:302021-07-14T04:10:54+5:30

नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मनोज जनार्दन भिसे (४५) याला १० वर्षे सश्रम ...

Manoj Bhise was sentenced to ten years rigorous imprisonment | मनोज भिसेला दहा वर्षे सश्रम कारावास

मनोज भिसेला दहा वर्षे सश्रम कारावास

नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मनोज जनार्दन भिसे (४५) याला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्या. के. जी. राठी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना नंदनवन येथील आहे.

पोलीस तक्रारीनुसार, आरोपीने हा गुन्हा ऑक्टोबर-२०१७ ते एप्रिल-२०१८ या कालावधीदरम्यान केला. त्यावेळी पीडित मुलगी १० वर्षे वयाची होती. आरोपीची मुलगी तिची मैत्रीण होती. त्यामुळे ती आरोपीच्या घरी खेळायला जात होती. आरोपीने संधी साधून तिच्यावर दोनदा लैंगिक अत्याचार केला. तसेच, याविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी गप्प राहिल्याने आरोपीचे धाडस वाढले. त्यानंतर एप्रिल-२०१८ मध्ये आराेपीने पीडित मुलीला दोनदा अश्लील व्हिडिओ दाखवले. त्यामुळे आरोपी पुन्हा लैंगिक अत्याचार करेल या भीतीपोटी मुलीने आजीला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. परिणामी, आरोपीविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता जायभाये यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Manoj Bhise was sentenced to ten years rigorous imprisonment