राेख रकमेसह मंगळसूत्र लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST2021-04-28T04:08:46+5:302021-04-28T04:08:46+5:30

काेंढाळी : अज्ञात आराेपीने घरफाेडी करून राेख एक हजार रुपये, साेन्याचे मंगळसूत्र व माेबाईल हॅण्डसेट असा एकूण २१ हजार ...

Mangalsutra lampas with rake amount | राेख रकमेसह मंगळसूत्र लंपास

राेख रकमेसह मंगळसूत्र लंपास

काेंढाळी : अज्ञात आराेपीने घरफाेडी करून राेख एक हजार रुपये, साेन्याचे मंगळसूत्र व माेबाईल हॅण्डसेट असा एकूण २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काेंढाळी आराेग्य केंद्र परिसरात शनिवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

जनार्दन बापून्याजी वरठी (६४, रा. पी.एच.सी. राेड, काेंढाळी) हे आपल्या कुटुंबीयांसह झाेपले असताना, घराच्या समाेरील दाराचा काेंडा उघडून अज्ञात आराेपीने घरात प्रवेश केला. यात आराेपीने घरातील सहा व चार हजार रुपये किमतीचे दाेन माेबाईल हॅण्डसेट, जनार्दन यांच्या पत्नीच्या पर्समधील राेख १,००० रुपये तसेच साेन्याचे जुने वापरातील मंगळसूत्र किंमत १० हजार रुपये असा एकूण २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच वरठी यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक फाैजदार दिलीप इंगळे करीत आहेत.

Web Title: Mangalsutra lampas with rake amount