करवसुलीने मनपात फिल गुड
By Admin | Updated: November 16, 2016 02:35 IST2016-11-16T02:35:44+5:302016-11-16T02:35:44+5:30
५०० व १००० रुपयांच्या नोटा चालविण्यासाठी गेल्या पाच दिवसात नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात

करवसुलीने मनपात फिल गुड
मनपा तिजोरीत १६.३६ कोटी जमा:
नोटा स्वीकारण्याला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नागपूर : ५०० व १००० रुपयांच्या नोटा चालविण्यासाठी गेल्या पाच दिवसात नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात मालमत्ता कर व पाणी बिलाची तसेच बाजार विभागाची वसुली मिळून १६ कोटी ३६ लाखांची रक्कम जमा केली आहे. यामुळे आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कर भरण्यासाठी चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले होते.
शुक्रवारी एकाच दिवसात ६ कोटी ३ लाख मालमत्ता कराच्या माध्यमातून जमा झाले होते. त्यानंतरही नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती. मंगळवारी २ कोटी ३ लाखांची वसुली झाली.
बाजार विभागाचीही ९० लाखांची वसुली झाली आहे. सुरुवातीला १४ नोव्हेंबरपर्यतच ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या जातील असे जाहीर केले होते. परंतु आता २४ नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी बँकापुढे रांगा असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.
परंतु या नोटामुळे महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होत आहे. (प्रतिनिधी)
मुदतवाढीचा नागरिकांनी लाभ घ्यावा
मालमत्ता कर भरण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्याला २४ नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना कर भरण्यासाठी या नोटांचा वापर करता येणार आहे. सर्व देयक स्वीकार
कें द्रावर बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
मिलिंद मेश्राम,सहायक आयुक्त , महापालिका
ओसीडब्ल्यूची २ . ३ लाखांची वसुली
मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी दहाही झोनमधील ओसीडब्ल्यूच्या कार्यालयात सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसात १६१८८ ग्राहकांनी २ कोटी ३ लाखाची थकबाकी भरली आहे. कर भरण्यासाठी ओसीडब्ल्यूकडून धनादेश, लहान मूल्याच्या नोटा तसेच डेबिट व क्रेडिट कार्डाव्दारे आॅन लाईन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र बाद झालेल्या नोटांचा वापर अगाऊ बिल भरण्यासाठी करता येणार नाही.