शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मनसर-खवासाचे चौपदरीकरण होणार

By admin | Updated: November 15, 2014 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, शुक्रवारी राज्य व केंद्र शासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, शुक्रवारी राज्य व केंद्र शासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे मनसर-खवासा महामार्गाच्या चौपदरीकरणापुढील अडथळे हटले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला या रस्त्याचे विकासकाम लवकरच सुरू करता येईल.सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासापर्यंतच्या ३७ किलोमीटर रोडचे चौपदरीकरण झाडे कापण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ व हरित लवादाची परवानगी मिळाली नसल्यामुळे रखडले होते. हा नवीन महामार्ग नसून जुन्याच महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता केवळ आजूबाजूची झाडे कापावी लागणार आहे. अशा प्रकल्पांसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची गरज नसल्याचे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, हरित लवादाच्या परवानगीची अट उच्च न्यायालयाने हटविली. परिणामी रखडलेल्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला यासंदर्भातील प्रस्ताव एक आठवड्यात केंद्र शासनाकडे पाठविण्याचे व केंद्र शासनाने या अहवालावर पुढील तीन आठवड्यांत निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर महामार्ग प्राधिकरणला काम सुरू करता येणार आहे. उच्च न्यायालयाने मनसर ते खवासापर्यंतच्या खराब रस्त्याची स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी याप्रकरणात मध्यस्थी अर्ज केला आहे. मध्यंतरी न्यायालयाने याचिकेचा विस्तार करून त्यात कोंढाळी उड्डाणपूल व पांढरकवड्याजवळच्या खराब रोडचाही समावेश केला. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, तर प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)