शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

प्रेमविवाहानंतर संसारात कटुता; तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 14:53 IST

ती तक्रार नोंदवत असताना आरोपी अनिकेत तेथे आला. त्याने तेथेही पत्नीशी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना अनिकेतने स्वत:चे डोके पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर आपटणे सुरू केले.

ठळक मुद्देनंदनवनमधील घटना काचेच्या तावदानावर स्वत:चे डोके आपटले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यात लग्नाच्या काही महिन्यातच कटुता आली. एकमेकांवर आरोप, अविश्वास दाखवत असल्याने त्यांच्यातील कटकटी वाढल्या. या पार्श्वभूमीवर, पत्नी पोलिसांकडे तक्रार देत असल्याचे पाहून तरुणाने पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर स्वत:चे डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अनिकेत जगदीश बडोदे (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो नंदनवन झोपडपट्टीत राहतो. गेल्या वर्षी त्याचे वस्तीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. काही महिन्यांपूर्वीच घरच्यांचा विरोध झुगारून या दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, आता त्यांच्यातील प्रेम ओसरू लागले आहे. एकमेकांवर संशय घेणे, आरोप लावून शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढल्याने त्यांचे पटेनासे झाले आहे. यामुळे त्याची पत्नी गुरुवारी दुपारी नंदनवन ठाण्यात पोहचली.

सविता शहाजी यादव नामक महिला सहायक पोलीस निरीक्षकांकडे ती तक्रार नोंदवत असताना आरोपी अनिकेत तेथे आला. त्याने तेथेही पत्नीशी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना अनिकेतने स्वत:चे डोके पोलीस ठाण्यातील काचेच्या तावदानावर आपटणे सुरू केले. त्यामुळे त्याला जबर जखमा झाल्या. पोलिसांनी त्याला वेळीच आवरल्याने संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी अनिकेतवर उपचार करून घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

...तिचीही धावपळ

डोळ्यादेखत पती आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे आणि त्यात तो गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्याच्याविरुद्ध तक्रार करायला आलेल्या पत्नीचाही राग शांत झाला. तिनेही नंतर त्याच्यासाठी धावपळ सुरू केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस