शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून; ८ वर्षांचा संसार उद्ध्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 15:01 IST

दाेघेही एकाच गावातील रहिवासी असल्याने त्यांची आपसात ओळख हाेती. याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला.

ठळक मुद्देइसापूर (खुर्द) येथील घटना : फरार आराेपी पतीस कळमेश्वरात अटक

काटाेल (नागपूर) : दारुड्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी गुरुवारी (दि. १२) रात्री भांडण उकरून काढले. त्यातच त्याने डाेक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला आणि लगेच घरातून पळ काढला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर (खुर्द) येथे घडली असून, पाेलिसांनी फरार आराेपी पतीस कळमेश्वर शहरातून शुक्रवारी (दि. १३) सकाळी अटक केली.

चित्रा संदीप घोरमाडे (३०) असे मृत पत्नीचे तर संदीप पद्माकर घोरमाडे असे अटक करण्यात आलेल्या आराेपी पतीचे नाव आहे. दाेघेही इसापूर (खुर्द), ता. काटाेल येथील रहिवासी आहेत. संदीपला दारूचे व्यसन आहे. शिवाय, ताे पत्नी चित्राच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याच कारणावरून त्या दाेघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची व भांडणात ताे चित्राला मारहाण करायचा. या प्रकाराबाबत चित्राने तिच्या आईला माहिती दिली हाेती. मात्र, आई नेहमीच तिची समजूत काढायची.

दरम्यान, त्या दाेघांमध्ये गुरुवारी रात्री याच कारणावरून भांडण झाले. भांडण विकाेपास जाताच संदीपने तिच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे चित्रा जखमी अवस्थेत खाली काेसळली. त्यातच संदीप घरून लगेच पळून गेला. सरपंचाने चित्राच्या आईला शुक्रवारी सकाळी तिच्या घरी जाण्याची सूचना केल्याने, ती सकाळी चित्राच्या घरी गेली हाेती. त्यावेळी तिला ती रक्ताच्या थाराेळ्यात ती पडून असल्याची दिसली. तिने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक गाेळा झाले.

त्यातच पाेलीस पाटील यांनी या घटनेची माहिती पाेलिसांनी दिली. पाेलिसांच्या एका पथकाने लगेच घटनास्थळ गाठले तर दुसऱ्या पथकाने लगेच आराेपी संदीपचा शाेध घ्यायला सुरुवात केली. ताे कळमेश्वर परिसरात असल्याचे लक्षात येताच, या पथकाने त्याला शिताफीने कळमेश्वर शहरातून ताब्यात घेत अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार महादेव आचरेकर करीत आहेत.

दाेघांचाही प्रेमविवाह

संदीप व चित्रा मूळचे इसापूर (खुर्द) येथील राहणारे असून, दाेघेही एकाच गावातील रहिवासी असल्याने त्यांची आपसात ओळख हाेती. याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. सुरुवातीच्या काळात त्यांचा संसार सुरळीत सुरू हाेता. शिवाय, दाेघेही मजुरी करून उदरनिर्वाह करायचे, अशी माहिती चित्राची आई पंचफुला अडकिने यांनी दिली. त्यातच काही वर्षांपूर्वी संदीपला दारूचे व्यसन जडले आणि ताे पत्नी चित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.

सरपंचाला दिली माहिती

संदीप चित्राच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्या दाेघांमध्ये नेहमीच भांडणे हाेत असल्याची माहिती पंचफुला अडकिने यांना हाेती. आपण चित्राची नेहमीच समजूत काढल्याचेही त्यांनी पाेलिसांना सांगितले. संदीपने चित्राचा खून केल्यानंतर पळ काढला. मात्र, त्याने या खुनाची माहिती फाेनवरून इसापूर (खुर्द) येथील सरपंचाला दिली हाेती. त्यामुळे सरपंचाने चित्राच्या आईला तिच्या घरी जाऊन बघण्याची सूचना केली हाेती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारkatol-acकाटोलPoliceपोलिस