लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील पाच लोकांवर हल्ला करून जीव घेणाऱ्या शिकारी वाघाला गुरुवारी बंदिस्त करून गोरेवाडा राष्ट्रीय वन उद्यानात आणण्यात आले. वन कर्मचाऱ्यांची चमू गुरुवारी सायंकाळी या वाघाला घेऊन रेस्क्यू सेंटरमध्ये पोहोचली. तिथे वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्याला गोरेवाडा येथील राष्ट्रीय उद्यानात आणून पिंजऱ्यात बंद करण्यात आले.या वाघाचे भ्रमणक्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यातील कोलाराजवळील करबडा, मदनापूर, देवरी, सातारा, बामनगाव हे होते. या गावालगतच्या पाच व्यक्तींवर या वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे या वाघाची परिसरात प्रचंड दहशत होती. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने धान रोवणीची कामे सुरू होत आहेत. ही गावे वनक्षेत्राला लागून असल्याने शेतीवर जायला गावकरी घाबरत होते. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर वाढली होती. गावकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात आला. व्याघ्र हल्ला झालेल्या पाचही घटनास्थळी केटी-१ या नर वाघाचे पगमार्क आढळले. यामुळे याच वाघाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांवरून या शंकेला पुष्टी मिळाली.या घटनेनंतर ताडोबा वनसंरक्षक कार्यालयाने राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्याकडे पत्रव्यवहार करून या वाघाल ट्रक्युलाईज करण्याची विनंती केली. राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणाने या वाघाला ३० जूनपर्यंत बंदिस्त करण्याची परवानगी दिली होती. परवानगीनंतर त्याला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले होते. दरम्यान १० जूनला तो पिंजऱ्यात अडकला. त्याला आता गोरेवाडा येथे आणण्यात आले आहे.
ताडोबातील नरभक्षक वाघआता गोरेवाड्यातील पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:06 IST
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील पाच लोकांवर हल्ला करून जीव घेणाऱ्या शिकारी वाघाला गुरुवारी बंदिस्त करून गोरेवाडा राष्ट्रीय वन उद्यानात आणण्यात आले. वन कर्मचाऱ्यांची चमू गुरुवारी सायंकाळी या वाघाला घेऊन रेस्क्यू सेंटरमध्ये पोहोचली. तिथे वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्याला गोरेवाडा येथील राष्ट्रीय उद्यानात आणून पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
ताडोबातील नरभक्षक वाघआता गोरेवाड्यातील पिंजऱ्यात
ठळक मुद्देपाच लोकांचा घेतला होता बळी : प्राधिकरणाच्या परवानगीनंतर झाली कारवाई