वेणा नदीत बुडून व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST2021-08-27T04:12:28+5:302021-08-27T04:12:28+5:30

बुटीबाेरी : दाेन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा वेणा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे ...

Man drowns in Vena river | वेणा नदीत बुडून व्यक्तीचा मृत्यू

वेणा नदीत बुडून व्यक्तीचा मृत्यू

बुटीबाेरी : दाेन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा वेणा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे पाण्याच्या टाकी परिसरातील वेणा नदीपात्रात बुधवारी (दि.२५) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्रेमदास तिरगुजी सहारे (४८, रा. जुनी वस्ती, प्रभाग क्र. ९, बुटीबाेरी) असे मृताचे नाव आहे. प्रेमदास हे निकाे कंपनीमध्ये कामासाठी जाताे म्हणून साेमवारी (दि.२३) घरून निघून गेले. सायंकाळी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शाेध घेतला. मात्र ते कुठेही आढळून न आल्याने त्याचा मुलगा निकेश प्रेमदास सहारे (२२, रा. जुनी वस्ती, बुटीबाेरी) याने वडिलांच्या बेपत्ता असण्याबाबत बुटीबाेरी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. दरम्यान, बुधवारी वेणा नदीत पाण्यात बुडून ते मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार धवराळ करीत आहेत.

Web Title: Man drowns in Vena river