शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एकाच ताटात जेवण्यास नकार दिल्याने बायकोला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 21:03 IST

Nagpur News एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आरोपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आरोपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. ही घटना मौदा शहरातील तक्षशीलनगर येथे गुरुवारी (दि. ९) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. (Man beat his wife for refusing to eat at one plate)

राकेश मेश्राम (२२, रा. तक्षशीलनगर, इंडालको गेट मोबाईलजवळ, मौदा) असे आरोपीचे नाव असून, चकॅली राकेश मेश्राम, असे जखमी महिलेचे नाव आहे. राकेशचे तीन वर्षांपूर्वी चकॅलीशी लग्न झाले असून, त्याला दारूचे व्यसन आहे. तो तिच्यावर संशय घेतो व तिला मारहाण करतो. त्यामुळे ती मंगळवारी (दि. ७) आपल्या वहिनीकडे गेली होती. दरम्यान, गुरुवारी राकेश तिथे गेला व तिला एकाच ताटात जेवण्यासाठी आग्रह करू लागला. यावर तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या गालावर व उजव्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. याबाबत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.याप्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेत त्याची सूचनापत्रावर सुटका केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राजू आंधळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी