शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मामा-भाच्याचे मृत्यू प्रकरण : शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 20:35 IST

शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकुंपणात सोडला वीज प्रवाह : खेकडे पकडताना गेला होता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.खेकडे पकडण्यासाठी जात असताना शेतातील कुंपणातून विजेचा करंट लागल्याने उमेश दयाराम मरसकोल्हे (वय ३०) सागर विनोद आतराम (वय १५, दोन्ही राहणार खडगी, कान्होलीबारा) या दोघांचा करुण अंत झाला होता. २८ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, जंगली जनावरांकडून शेतपिकाची नासाडी केली जात असल्याने आरोपी रवींद्र निहारे याने आपल्या शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडला होता. उमेश आणि विनोद हे दोघे शेतातून खेकडे पकडण्यासाठी जात होते. त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे कुंपणाला हात लावताच त्यांना जोरदार विजेचा करंट लागला आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला. २८ नोव्हेंबरला सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोपी निहारेने त्यांचे मृतदेह बाजूच्या शेतात नेऊन टाकले. पोलीस चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी निहारेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू