सखींनी घेतल्या मेकअपच्या टीप्स

By Admin | Updated: November 10, 2014 01:02 IST2014-11-10T01:02:06+5:302014-11-10T01:02:06+5:30

सौंदर्य देवाने दिलेली भेट आहे. सौंदर्याला टिकविणे आणि आकर्षक बनविण्याचे काम मेकअप मॅन करतो. सिनेजगतात हा मेकअपमॅन सौंदर्यवतींच्या अगदी जवळचा असतो. नागपूरचाच एक मेकअपमॅन

Make-up teapots | सखींनी घेतल्या मेकअपच्या टीप्स

सखींनी घेतल्या मेकअपच्या टीप्स

मेकओव्हर : पंढरीदादा जुकेर यांनी उलगडला सौंदर्य सेवेचा प्रवास
नागपूर : सौंदर्य देवाने दिलेली भेट आहे. सौंदर्याला टिकविणे आणि आकर्षक बनविण्याचे काम मेकअप मॅन करतो. सिनेजगतात हा मेकअपमॅन सौंदर्यवतींच्या अगदी जवळचा असतो. नागपूरचाच एक मेकअपमॅन सध्या बॉलिवृडच्या सौंदर्यवतीच्या सौंदर्यात भर घालतोय. त्याचे प्रचंड आकर्षण नागपूरकर सखींना आहे. त्यामुळेच अ‍ॅमोर ब्राईडल आर्ट व लोकमत सखी मंचद्वारे आयोजित ‘मेकओव्हर’ या कार्यक्रमात मूळचा नागपूरकर मेकअप मॅन व अ‍ॅमोर ब्राईडल आर्टचा सर्वेसर्वा अनुराग मदनकर याच्याकडून टीप्स घेण्यासाठी सखींचा चांगलाच प्रतिसाद लाभला.
‘मेकओव्हर’ या कार्यक्रमात प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त पंढरीदादा जुकेर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला लोकमत सखी मंचच्या नेहा जोशी, श्रीकांत गडकरी, दीक्षित सर उपस्थित होते. अनुराग यांच्याहस्ते दादांचा सत्कार करण्यात आला. सिनेजगतातील जुन्या अभिनेत्रीपासून आजच्या नविन अभिनेत्रीचा मेकअप त्यांनी आपल्या हाताने केला आहे. गेल्या ६३ वर्षापासून पंढरीदादा सौंदर्य सेवेचे कार्य करीत आहे. त्यांनी आपले अनुभव यावेळी सखींपुढे मांडले. आयुष्यात प्रत्येकजण मेहनत करतो. मात्र मेहनतीला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल तर फळ नक्कीच मिळते. अनुराग हा माझा शिष्य असून, त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे हे फळ मिळाले असल्याचे दादा म्हणाले.
कार्यक्रमात अनुराग यांनी नववधूचा संपूर्ण मेकअप व वेस्टर्न मेकअप करून दाखविला. मेकअपचे बेसिक, त्यातील बारकावे, घ्यायची काळजी याची माहिती दिली. वातावरणानुसार अथवा बदलत्या ऋतुनुसार, पार्टीला जातांना कुठले मेकअप करावे, याच्याही टिप्स दिल्या. त्याचबरोबर फाऊंडेशन, क्रीम, पावडर कुठले वापरावे याचीही माहिती दिली. हेअरस्टाईलचे विविध प्रकार त्यांनी करून दाखविले. प्रात्याक्षिक दाखविताना अनुरागने मार्गदर्शक निवेदनही केले. अनेक सखींनी अनुरागने दिलेल्या सर्व टीप्स नोंदवून घेतल्या.
कार्यक्रमाला जुही पाहुणे, नेहा फरकसे या मेकअप मॉडेल बरोबर प्रकाश मदनकर, पुष्पा मदनकर, यश मदनकर, आश्विनी अग्निहोत्री, दिव्याश्री भावाळकर, वैशाली बालपांडे, अविनाश गोतमारे व जय सच्चिदानंद मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन विशाखा दीक्षित यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Make-up teapots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.