गायरान जमिनी नावे करा

By Admin | Updated: December 17, 2015 03:26 IST2015-12-17T03:26:45+5:302015-12-17T03:26:45+5:30

गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे

Make Gairan land names | गायरान जमिनी नावे करा

गायरान जमिनी नावे करा

मानवी हक्क अभियानतर्फे विधिमंडळावर मोर्चा
नागपूर : गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भटक्या विमुक्त जमातीतील नाथजोगी समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवी-देवतांच्या वेषभूषा करून सहभागी झालेल्या नाथजोगी समाजाच्या मंडळींनी आपली अदाकारी मोर्चास्थळी सादर केली. अतिक्रमित गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी शासन दरबारी केली.
नेतृत्व
डॉ. मिलिंद आवाड, राजेंद्र काळे, दादासाहेब क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, रोहिणी खंडारे
मागणी
२०१० पर्यंतच्या गायरान जमिनीचे मालकी पट्टे कसत असणाऱ्यांना देण्यात यावेत.
दारिद्र्य रेषेचा चुकीचा सर्वे पुन्हा करण्यात यावा.
भटके-विमुक्तांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
विधवा परितक्त्या महिलांना ५००० रुपये मानधन लागू करावे.

Web Title: Make Gairan land names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.