पेठ इस्माईलपूरच्या सरपंचपदी माकाेडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:08 IST2021-04-14T04:08:36+5:302021-04-14T04:08:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील पेठ इस्माईलपूर-खडकी-चांदणीबर्डी गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी साेमवारी निवडणूक घेण्यात आली. यात राष्ट्रवादी ...

Makade won as Sarpanch of Peth Ismailpur | पेठ इस्माईलपूरच्या सरपंचपदी माकाेडे विजयी

पेठ इस्माईलपूरच्या सरपंचपदी माकाेडे विजयी

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील पेठ इस्माईलपूर-खडकी-चांदणीबर्डी गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी साेमवारी निवडणूक घेण्यात आली. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थित गटाचे सेवक माकाेडे यांनी विराेधी गटाचे याेगेश नारनवरे यांचा पाच मतांनी पराभव केला. माकाेडे यांना नऊपैकी पाच तर नारनवरे यांना चार मते मिळाली. माकाेडे यांनी नारनवरे यांचा एका मताने पराभव केल्याने त्यांची सरपंचपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

या गट ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थित गटाची सत्ता आहे. येथील सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले हाेते. परंतु, या प्रवर्गातील एकही ग्रामपंचायत सदस्य या ग्रामपंचायतमध्ये निवडून न आल्याने सरपंचपदाचा तिढा निर्माण झाला हाेता. त्यामुळे येथील सरपंचपद रिक्त ठेवून पूर्वी डांगरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आणि त्यांच्याकडेच सरपंचपदाचा प्रभार साेपविण्यात आला हाेता.

दरम्यान, या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच अनुसूचित जाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आल्याने साेमवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सेवक माकाेडे व याेगेश नारनवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात माकाेडे यांनी नारनवरे यांचा एका मताने पराभव केला. माकाेडे यांना पाच तर नारनवरे यांचा चार मते मिळाली. यावेळी ज्ञानेश्वर माळोदे, नारायण ठाकरे, राजेश पोटपिटे, नीलेश ढोरे, श्याम देशमुख, सदाशिव ठोंबरे, जनार्दन माकोडे, भाऊराव नाखले, जयपाल चौरे, नितेश माळोदे, तुषार माकोडे, प्रतीक डांगरे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: Makade won as Sarpanch of Peth Ismailpur