बहुसंख्य खासगी रुग्णालयांच्या केंद्रावर लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:14+5:302021-04-05T04:07:14+5:30
८९ पैकी ५१ केंद्रावर झाले लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २४ बाय ७ ...

बहुसंख्य खासगी रुग्णालयांच्या केंद्रावर लसीकरण नाही
८९ पैकी ५१ केंद्रावर झाले लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २४ बाय ७ लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बहुसंख्य खासगी रुग्णालयातील केंद्रावर लसीकरण झाले नाही. जेथे लसीकरण करण्यात आले तेथील संख्या मोजकीच आहे. नागपूर शहरातील ८९ लसीकरण केंद्रापैकी फक्त ५१ केंद्रावर रविवारी लसीकरण करण्यात आले.
रविवारी नागपूर शहरात ८१६६ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. यात पहिला डोस घेणारे ७८६६ तर दुसरा डोस ३०० लाभाथींंनी घेतला. यात २०८ आरोग्य कर्मचारी ४८२ फ्रंन्टलाईन वर्कर, ४५ वर्षावरील अधिक वयाचे सामान्य वर्गातील २०१६, तर ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेले ३२७३ व ६० वर्षावरील १८४२ लाभार्थींनी लस घेतली. अनेक खासगी केंद्रावर लसीकरण होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित रुग्णालयांना यासंदर्भात स्पष्टीकरण मागण्यात आले होते. यात त्यांनी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दिले होते.