शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हरपूर जमीन घोटाळा प्रकरणात मोठी उलथापालथ; ॲड. परचुरेंनी सोडली न्यायालय मित्राची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:08 IST

अॅड. पाध्ये असतील नवे न्यायालय मित्र

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हरपूर जमीन घोटाळा प्रकरणात बुधवारी मोठी उलथापालथ झाली. ॲड. आनंद परचुरे यांनी न्यायालय मित्राची जबाबदारी सोडली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या जागेवर ॲड. निखिल पाध्ये यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.

ॲड. परचुरे यांनी काही वर्षांपूर्वी एका प्रकरणात या जमिनीच्या मूळ मालकातर्फे कामकाज पाहिले होते. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यासने ॲड. परचुरे यांना या प्रकरणात न्यायालय मित्र म्हणून कायम ठेवण्यास आक्षेप घेतला. परिणामी, ॲड. परचुरे यांनी स्वत:च न्यायालय मित्राच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने ती विनंती मान्य केली. शहरातील आरक्षित भूखंडांच्या बेकायदा नियमितीकरणाविरुद्ध उच्च न्यायालयात २००४ पासून जनहित याचिका प्रलंबित आहे.

हरपूर घोटाळ्याशी संबंधित १६ आरक्षित भूखंड या याचिकेचा भाग आहे. ॲड. परचुरे १९ वर्षांपासून या याचिकेचे कामकाज पाहत होते. संबंधित भूखंड (खसरा क्र. ९, १०, ११, १२ व १६/२) सक्करदरा स्ट्रीट स्कीमसाठी आरक्षित आहेत. उज्ज्वल सहकारी गृहनिर्माण संस्थेने आरक्षित जमिनीवर अनधिकृत ले-आऊट टाकून हे भूखंड विकले आहेत. हे भूखंड गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित केले जाऊ शकत नाहीत.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक भूमाफिया नागपुरातील कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक जमिनी घशात घालत आहेत. त्यामुळे नगररचनेची एैशीतैशी झाली आहे. अशा घोटाळ्यात सहभागी अधिकारी, भूमाफिया आदींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हरपूर जमीन घोटाळा गाजवला होता. आता सर्वांना या प्रकरणात ठोस कारवाईची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरEnchroachmentअतिक्रमण