शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

नागपूर महापालिकेत मोठे फेरबदल, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:43 IST

Nagpur : ५ कार्यकारी अभियंता, ३ उपअभियंता, १२ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत बऱ्याच काळानंतर मोठे बदल करण्यात आले आहेत. ५ कार्यकारी अभियंता, ३ उपअभियंता व १२ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तर पदोन्नतीनंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या ७ कार्यकारी अभियंता, ३२ उपअभियंता व २९ कनिष्ठ अभियंत्यांना पोस्टिंग दिली आहे.

बदल्या आणि नियुक्तीदरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकनदेखील करण्यात आले. ज्यांचे काम समाधानकारक नव्हते त्यांची बदली करण्यात आली आहे. तर अनेकांचे प्रभार बदलण्यात आले आहे. तर काही अधिकारी जे बराच काळ पदभार सांभाळत होते आणि त्यांच्या विभागात चांगले काम करत होते, त्यांचा पदभार कायमस्वरूपी पोस्टिंगमध्ये बदलण्यात आला. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्या व पोस्टिंगमुळे अडचणीचेही ठरू शकणार आहे. कारण नवीन अधिकाऱ्याला नवीन ठिकाणचे काम समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार काम करण्यासाठी काही महिने लागतात. 

३२ कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंत्याची बढती दिली आहे. यात श्वेता दांडेकर यांना उपअभियंता स्थापत्य व जाहिरात विभाग, वैजयंती आडे यांना उपअभियंता नगररचना, अभिजित नेताम यांना लक्ष्मीनगर झोन, यू, जी. खंडाते यांना प्रवर्तन विभाग, राजू गौतम यांना उपअभियंता प्रकल्प २ रवी मांगे यांना उपअभियंता ड्रेनेज मुख्यालय, जितेंद्र सहारे यांना उपअभियंता एसआरए, देवेंद्र भोवते यांना उपअभियंता लकडगंज येथे पोस्टिंग दिली आहे. उर्वरित उपअभियंत्यांनाही वेगवेगळ्या विभागात पोस्टिंग दिली आहे.

सिंह, गुरुबक्षानी, रक्षमवार, माटे, पाराशर यांची बदलीमनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार बुधवारी ५ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. हनुमाननगर झोनचे कार्यकारी अभियंता मनोज सिंह यांना शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता, धरमपेठ झोनचे विजय गुरुबक्षानी यांना हनुमाननगर झोनच्या कार्यकारी अभियंत्यांचा चार्ज देण्यात आला. गांधीबाग झोनचे सचिन रक्षमवार यांची बदली लकडगंज झोनमध्ये झाली. तर लकडगंज झोनचे संजय माटे यांची बदली मुख्यालयातील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (ड्रेनेज) व स्थापत्य विभागाचे पंकज पाराशर यांना मुख्य अभियंता यांच्याखाली मुख्यालयात पोस्टिंग देण्यात आली. त्याच प्रकारे तीन उपअभियंत्यांच्या बदल्यांचे आदेशही देण्यात आले आहे. आनंद मोखाडे यांची नगररचना विभागातून हनुमाननगर झोन, प्रवीण आगरकर यांची हनुमाननगर झोनमधून डीपीडीसी दक्षिण, मंगेश गेडाम यांची नगर रचना विभागातून काढून डीपीडीसी पश्चिममध्ये बदली करण्यात आली आहे. 

१२ ज्युनिअर इंजिनिअरच्या बदल्याजेई डी. आर. टेकाम यांची हनुमाननगर झोनमधून धंतोली झोनमध्ये बदली करण्यात आली आहे. पुंडलिक ढोरे यांना धंतोलीतून धरमपेठ झोनमध्ये पाठविण्यात आले आहे. अरुण पेठेवार यांना स्लम विभागातून धरमपेठ झोनमध्ये पाठविण्यात आले आहे. आशिष तालेवार यांना हॉटमिक्स प्लांटमधून नगररचना विभागात पाठविण्यात आले आहे. मनीष भोयर यांना नेहरूनगर झोनमधून नगररचना विभागात, ए. एम. मानकर यांना गांधीबाग झोनमधून मनपा मुख्यालयातील पीडब्ल्यूडी विभागात, कमलाकर राजूरकर यांना सतरंजीपुरा झोनमधून लकडगंज झोनमध्ये, पुरुषोत्तम पांडे यांची लक्ष्मीनगर झोनमधून डीपीडीस सेल येथे, राहुल रोकड़े यांची हॉटमिक्स प्लांटमधून शिक्षण विभागात, विनोद वाजे यांची सतरंजीपुरा झोनमधून हनुमाननगर झोन, प्रदीप होले यांची सतरंजीपुरा झोनमधून मध्यवर्ती गुणवत्ता नियंत्रण कक्ष, ज्योती कुबडे यांची मध्यवर्ती गुणवत्ता नियंत्रण कक्षातून नगररचना विभागात बदली करण्यात आली आहे.

७ कार्यकारी अभियंत्यांना मिळाली पोस्टिंग७ उपअभियंत्याना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती दिली आहे. यात व्ही. यू. जुनघरे यांना कार्यकारी अभियंता गुणवत्ता नियंत्रण कक्ष (सिक्यूसी लॅब), एस. आर. गजभिये यांना कार्यकारी अभियंता क्रीडा व सांस्कृतिक विभाग, प्रवीण कोटांगळे यांना कार्यकारी अभियंता स्लम विभाग व स्थावर विभाग, प्रशांत सोनकुसळे यांना कार्यकारी अभियंता उद्यान विभाग, आर. जे. दुपारे यांना कार्यकारी अभियंता (एसडब्ल्यूएम) पर्यावरण व संवर्धन, मनोज गद्रे यांना कार्यकारी अभियंता धरमपेठ, गिरीश लिखार यांना कार्यकारी अभियंता नेहरूनगर झोनमध्ये पोस्टिंग दिली आहे.

 

टॅग्स :Transferबदलीnagpurनागपूर