शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा योजनेत मोठ्या सुधारणा; सरकारनेच उतरवला स्वतःचा विमा

By सुनील चरपे | Updated: June 27, 2025 14:35 IST

१३ खरीप पिकांचा समावेश : १२ जिल्ह्यांत सोयाबीनच्या हप्त्यात सरकारचा हिस्सा

सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२३-२४ मध्ये लागू केलेल्या एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेत सरकारने सुधारणा केल्या आहेत. सुधारित योजनेत सोयाबीन वगळता अन्य १२ पिकांच्या हप्त्यांमध्ये तसेच १५ जिल्ह्यात सोयाबीनमध्ये केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा राहणार नाही. नवीन सुधारणेनुसार केंद्र व राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामात किमान ५,७२८ कोटी रुपये वाचविल्याने ही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

सुधारित योजनेत राज्यातील २९ पैकी २४ जिल्ह्यांमधील १५ खरीप व सहा रब्बी पिकांचा समावेश केला आहे. यावर्षी २४ जिल्ह्यांपैकी धाराशिव, लातूर व बीड या तीन जिल्ह्यांसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे तर उर्वरित २१ जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. पूर्वी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना तर उर्वरित ९८ टक्के रक्कम केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्क्यांप्रमाणे द्यायचे. एक रुपयात विमा केल्यानंतर हप्त्यातून एक रुपया वजा करून उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारने दिली.

आता विमा हप्त्यापोटी पीकनिहाय संरक्षित रकमेच्या ०.२५ ते १.५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. नुकसानभरपाई ही ८०:११० या कप व कॅप मॉडेलनुसार दिली जाणार आहे.

सरकारने ५,७२८ कोटी रुपये वाचविलेएक रुपयात पीकविमा असताना २०२४-२५च्या खरीप हंगामात विमा हप्त्यापोटी राज्य सरकारने ४,८०२ कोटी व केंद्राने ३,२८२ कोटी असे एकूण ८,०८४ कोटी रुपये कंपन्यांना दिले होते. ही रक्कम आता शेतकऱ्यांना द्यावी लागणार असल्याने सरकारची जवळपास ५० टक्के रक्कम वाचणार आहे. २०२४-२५च्या रब्बी हंगामात राज्याने १,०४२ कोटी व केंद्राने ६४४ कोटी, असे एकूण १,६८६ कोटी रुपये कंपन्यांना दिले होते. सरकारचीही १०० टक्के रक्कम वाचणार आहे.

शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार

  • पूर्वी विपरित हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाई दिली जायची. ती सुधारित योजनेत मिळणार नाही.
  • ही योजना पीक कापणी प्रयोग आधारित असल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत कंपनीला कळवावी लागणार नाही.
  • या योजनेत शेतकऱ्यांना विमा काढूनही ३० टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले यांनी दिली.
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाnagpurनागपूर