आता रेशनवर मिळणार मका व ज्वारीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST2021-02-14T04:07:58+5:302021-02-14T04:07:58+5:30
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका -७,५७,३५२ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - १,३२,००५ अंत्योदय शिधापत्रिका -१,०८,६१७ एपीएल शिधापत्रिका - ५,१६, ७३० लोकमत न्यूज ...

आता रेशनवर मिळणार मका व ज्वारीही
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका -७,५७,३५२
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - १,३२,००५
अंत्योदय शिधापत्रिका -१,०८,६१७
एपीएल शिधापत्रिका - ५,१६, ७३०
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राधान्य गटातील लोकांसाठी रेशनच्या दुकानात आता मका व ज्वारीही शासनाने उपलब्द करून दिली आहे. फेब्रुवारीपासून त्याचे वितरण होणार असल्याचे सांगितले जााते.
नागपूर जिल्ह्यात एकूण ७ लाख ५७ हजार ३५२ रेशन कार्ड धारक आहेत. यात ३ लाख ८९ हजार ५६४ कार्ड धारक ग्रामीण भागात तर ३ लाख ६७ हजार ७८८ कार्डधारक शहरातील आहेत. दोन्ही मिळून विचार केला तर जिल्ह्यात प्राधान्य गट असलेले कार्ड धारक १ ,३२,००५ व १,०८,६१७ अंत्योदय कार्डधारक आहेत. यांना याचा लाभ मिळणार आहे. मका व ज्वारी उपलब्ध होणार असली तरी यासाठी हक्काचा गहू मात्र कमी केला जाणार आहे. मका किंवा ज्वारी ही केवळ एक किलोच मिळेल. मका किंवा ज्वारी हवी असेल तर एक किलो गहू कमी दिला जाईल.
(बॉक्स)
एक किलोला एक रूपया
अंत्योदय व प्राधान्य गटासाठी ज्वारी व मका रेशनवर उपलब्ध आहे. एक रुपया किलो या प्रमाणे हा उपलब्ध आहे. सोबतच प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांसाठी प्रति व्यक्ती दोन रुपये प्रमाणे तीन किलो गहू, व तीन रुपये प्रमाणे दोन किलो तांदूळ तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी प्रति शिधापत्रका दोन रुपये प्रमाणे १५ किलो गहू व तीन रुपये प्रमाणे २० किलो तांदूळ मिळेल. मका किंवा ज्वारी घेतली तर एक किलो गहू कमी मिळेेल.
कोट
रेशनच्या दुकानात ज्वारी व मका देण्याची योजना आहे. शासनााची ही योजना तशी जुनीच आहे. ज्या ठिकाणी ज्वारी व जिथे मका उपलब्ध होईल तिथे मका उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक रेशन कार्ड १ रुपयात १ किलो याप्रमाणे दिले जाते. ज्यांना मका किंवा ज्वारी हवी असेल त्यांना एक किलो गहू कमी दिला जातो.
भास्कर, तायडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा
लाभार्थी काय म्हणतात?
चांगली योजना आहे
शासनाने रेशनच्या दुकानात ज्वारी व मका उपलब्ध करून दिली ते चांगले आहे. ज्वारी खाणाऱ्यांची संख्याही माोठ्या प्रमाणावर आहे. सध्या शहरात राहणाऱ्यांना ज्वारी मिळणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत त्यांना रेशनच्या दुकानातच ज्वारी मिळू लागली तर चांगलेच आहे.
सुखदेव डोंगरे
लाभार्थी
गहू कमी करू नये
रेशनवर मका व ज्वारी दिली जात असल्याचे स्वागतच आहे. परंतु त्यासाठी गहू कमी केला जाऊ नये. प्राधान्य गटाला केवळ तीन किलो गहू मिळतो. यात एक किलाो गहू कमी करणे योग्य होणार नाही. दोन्ही कायम असावे.
सुभाष गडलिंग
लाभार्थी