शहरं
Join us  
Trending Stories
1
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
2
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
3
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
4
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
5
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
6
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
7
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
8
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
9
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
10
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
11
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
12
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
13
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
14
Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन
15
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
16
Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
17
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
18
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
19
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
20
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेयने नागपुरातही घातला ५० कोटींनी गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:47 IST

पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या  आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या  मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवर्षा सतपाळकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखलसात हजार गुंतवणूकदारांची फसवणूकएक हजाराहून अधिक एजंट

ऑनलाईन लोकमतनागपूर : पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या  आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या  मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रेयच्या प्रमुख वर्षा सतपाळकर यांच्यासह सहा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी बनविले आहे. फसवणुकीचे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर ही कारवाई झाली आहे.वर्षा सतपाळकर, लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री, अशी आरोेपींची नावे आहेत. हे सर्व मुंबईच्या वसई येथील राहणारे आहेत.मैत्रेय सर्व्हिसेस समूहाची स्थापना १९८८ मध्ये वसई येथे वर्षा सतपाळकर हिचे पती मधुसूदन सतपाळकर यांनी केली होती. २०११ मध्ये मधुसूदन यांच्या मृत्यूनंतर वर्षा ही कंपनीची सर्वेसर्वा झाली. तिने मैत्रयचा शाखा विस्तार राज्यातील प्रमुख शहरात करीत गुंतवणूकदरांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचे काम सुरू केले. २०१० मध्येच नागपुरात मैत्रेयच्या गोरखधंद्याला सुरुवात झाली होती. नागपुरात पंचशील चौकात मैत्रयचे कार्यालय उघडण्यात आले होते. यानंतर मुंजे चौकात फॉर्च्युन मॉलमध्ये या कंपनीने कार्यालय थाटले होते. मैत्रेयचे नागपुरात एक हजाराहून अधिक एजंट होते. ते विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष देत जाळ्यात अडकवीत होते.गुंतवणूकदारांना जमा ठेव योजनेत पैसे भरणे, स्वर्ण सिद्धी योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट देण्याची हमी, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याच्या विविध योजना सांगून ते गुंतवणूकदारांची फसवणूक करायचे. मैत्रेयच्या या योजना गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांत अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या. गुंतवणूक केल्यानंतर कंपनीकडून गुंतवणूकदारांना धनादेश आणि वचनपत्र दिले जात होते. यासोबतच निर्धारित कालावधीत पैसे, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याची हमी दिली जात होती. २०१३ मध्ये मैत्रय कंपनीचे बिंग फुटले. कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. नागपूरसह राज्यातील इतर शहरातही मैत्रेयच्या शाखात गोंधळ उडाला होता. नाशिक येथे गुंतवणूदारांच्या तक्रारीनंतर वर्षा सतपाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर याला अटक केली होती. या कारवाईनंतर नागपुरातही गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याची खात्री पटली होती. गुंतवणूकदारांनी यानंतर मैत्रेयच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गोंधळ घातला होता. यानंतर धंतोली पोलिसात तक्रारही नोंदविली होती. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसल्याने गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती.आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जवाहरनगर, मानेवाडा येथील संतोषकुमार मिश्रा यांच्यासह ७ हजार गुंतवणूकदार यात अडकल्याचे दिसून आले आहे. गुंतवणूकदारांनी विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले. तक्रारकर्ते मिश्रा यांनी वर्ष २०११ ते २०१३ च्या दरम्यान ६४ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली होती. यावर मिश्रा यांना ३१ मार्च २०१७ रोजी १ लाख १४ हजार ६६० रुपये आणि १०९८ चौरस फूट प्लॉट देण्याची आमिष देण्यात आले होते. मात्र तारीख संपल्यानंतर पैसे आणि प्लॉट मिळाला नसल्याने मिश्रा यांनी मैत्रयच्या स्थानिक अधिकाºयांची अनेकदा भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी धंतोली पोेलिसाकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.