लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : जिल्हा प्रशासनाने काेराेना संक्रमणामुळे आठवडी बाजारावर तात्पुरती बंदी घातली असली तरी माैदा शहरात शुक्रवारी (दि. १९) आठवडी बाजार भरला हाेता. हा बाजार मुख्य मार्गाच्या दाेन्ही बाजूंनी भरत असल्याने एकीकडे वाहतुकीची काेंडी हाेते तर दुसरीकडे बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा उडालेला फज्जा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता बळावली आहे.
माैदा शहरात आठवड्यातील दाेन दिवस आठवडी बाजार भरताे. जागेअभावी हा बाजार शहरातील मुख्य मार्गालगत अर्थात बसस्थानक ते जयस्तंभ चाैकादरम्यान भरताे. या मार्गाचे अलीकडेच चाैपदरीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर शहरातील जनता विद्यालय, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक व भारतीय स्टेट बँकेची शाखा, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, गुरांचा दवाखाना, भूमी अभिलेख कार्यालय, जुनी लोकवस्ती व चक्रधर स्वामी दीप असे महत्त्वाची कार्यालये आहेत.
परिणामी, हा मार्ग वर्दळीचा असून, दाेन्ही बाजूंनी दुकाने असल्याने भाजीपाला व इतर साहित्य विक्रेते त्यांची दुकाने या मार्गाच्या मध्यभागी थाटतात. नागरिक खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा हाेताे. या बाजारात बहुतांश नागरिक विना मास्क फिरत असल्याचे तसेच कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली असून, या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले हाेते.
....
बाजाराच्या जागेची समस्या कायम
माैदा शहरात पूर्वी ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरायचा, ती जागा अपुरी पडायला लागल्याने दुकानदारांनी त्यांची दुकाने राेडलगत थाटायला सुरुवात केली. मात्र, प्रशस्त जागा उपलब्ध करून देत ही समस्या प्रशासनाने साेडवली नाही. बाजारामुळे हाेणारी मुख्य मार्गावरील वाहतूक काेंडी व त्यातून बळावलेली अपघाताची शक्यता लक्षात घेता स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने ही समस्या कायमस्वरूपी साेडवावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.