लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : रामटेक मार्गावरील माैदा ते नेरला रस्त्याची चांगलीच दुर्दशा झाली असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. यामुळे अपघातसुद्धा वाढले आहेत. काही दिवसापूर्वीच एका २० वर्षीय तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नादुरुस्त रस्त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडाेळाच करीत असल्याचा आराेप ग्रामस्थांचा आहे.
माैदा-रामटेक मार्गावरील पेट्राेल पंप ते सिमेंट कंपनी आष्टीपर्यंतच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करून रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी नेरला ग्रामपंचायत सदस्य राेशन मेश्राम यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे निवेदन साेपविले आहे. या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले असून, जागाेजागी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम कित्येकदा करण्यात आले. मात्र प्रत्येक वेळी हा रस्ता पुन्हा जैसे थेच हाेताे. त्यामुळे या रस्त्याची थातूरमातूर दुरुस्ती केली जात असल्याचा आराेपही गावकऱ्यांनी निवेदनातून केला आहे.
250821\img-20210825-wa0033.jpg
मौदा नेरला मार्ग खड्यात