कामठी तालुक्यातील २४ ग्रा.पं.मध्ये महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:18+5:302021-02-06T04:13:18+5:30
कामठी : कामठी तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. तीत तालुक्यातील ४७ पैकी ...

कामठी तालुक्यातील २४ ग्रा.पं.मध्ये महिला राज
कामठी : कामठी तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. तीत तालुक्यातील ४७ पैकी २४ ग्रा.पं.वर महिला सरपंच विराजमान होणार आहे. २०२५ पर्यंत हे आरक्षण लागू असेल. नव्या आरक्षण सोडतीनुसार महालगाव, भूगाव, येरखेडा आणि आवंढी ग्रा.पं.चे सरपंचपद अनुसूचित जाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यासोबतच नान्हा, सुरादेवी, नेरी,लिहिगावचे सरपंचपद अनुसूचित जाती (महिला) करिता आरक्षित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीकरिता ३ ग्रा.पं.आरक्षित करण्यात आल्या आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी उमरी तर वारेगाव आणि खेडी अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. नामाप्र (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी कवठा, आजणी, बिना, रनाळा, टेमसना आणि परसाड ग्रा.पं.च्या सरपंचपद आरक्षित करण्यात आले. नामाप्र (महिला) संवर्गात जाखेगाव, गुमथळा, खापा, चिखली, वरंभा, भामेवाडा, घोरपड ग्रा.प.चे सरपंचपद आरक्षित ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २३ ग्रा.पं.चे सरपंचपद आरक्षित झाले आहे. यात सर्वसाधारण गटासाठी लोणखैरी, कोराडी, केम, भोवरी, कढोली, केसोरी, दिघोरी, गारला, वडोदा, आडका, गादा आणि बाबुळखेडा ग्रा.पं.तर सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी सोनेगाव, गुमथी, खसाळा, खैरी, शिवणी, पानगाव, कापसी (बु), भिलगाव, चिकना, बिडगाव, तरोडी (बु) आरक्षित झाले आहे. तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवेळी नायब तहसीलदार एस. एन. कवटी, राजेश माळी, एस.जी. चंद्रिकापूरे, दुयम पोलीस निरीक्षक राधेशाम पाल यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
९ ग्रा.पं.च्या सरपंच पदासाठी ११ रोजी निवडणूक
१५ जानेवारीला तालुक्यातील महालगाव, खेडी, टेमसना, भामेवाडा, घोरपड, लोणखैरी, कोराडी, केसोरी ,पवनगाव या ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होईल. याकरिता विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोचेर्बांधणीला सुरुवात केली आहे.