रामटेकच्या गडावरही महायज्ञाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:05+5:302021-07-12T04:07:05+5:30

रामटेक : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व आकाशझेप फाऊंडेशनच्यावतीने रविवारी परसोडा, रामटेक येथील हनुमान मंदिर समाजभवन येथे रक्तदान शिबिर ...

The Mahayagya also strengthened the fort of Ramtek | रामटेकच्या गडावरही महायज्ञाला बळ

रामटेकच्या गडावरही महायज्ञाला बळ

रामटेक : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व आकाशझेप फाऊंडेशनच्यावतीने रविवारी परसोडा, रामटेक येथील हनुमान मंदिर समाजभवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानाच्या या महायज्ञानाला रामटेकच्या गडावर बळ मिळाले. रामटेककरांनी शिबिरात स्वयंस्फूर्तपणे हजेरी लावत रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

माजी आमदार डी.एम.रेड्डी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यासोबतच आ.आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, काँग्रेसचे जिल्हा महासचिव उदयसिंग यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी शिबिरात सहभागी होत ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेचे कौतुक केले. रामराज्य ढोलताशा पथक, बेटी बचाव बेटी पढाव, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. याप्रसंगी पत्रकार नत्थु घरजाळे यांच्या संपूर्ण कुटुंबाने रक्तदान केले. शिबिरात रक्तसंकलाने कार्य मेयो येथील चमूने केले.

Web Title: The Mahayagya also strengthened the fort of Ramtek