शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची एसएनडीएलविरुद्ध कडक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:25 IST

आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती आराखडा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठ्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश : दर १५ दिवसानी संयुक्त बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती आराखडा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश दिले आहे.एसएनडीएलच्या क्षेत्रात वीज पुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. परिस्थिती समजून घेण्याच्या उद्देशाने महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांनी शुक्रवारी एसएनडीएलतर्फे करण्यात येणाऱ्या विकास कामांचे निरीक्षण केले. यादरम्यान आढावा बैठकीत त्यांनी वीज पुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी दर १५ दिवसात महावितरण आणि एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचेही निर्देश दिले.यावेळी साबू यांनी वर्षभरातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात यावे, आयपीडीएस, कॅपेक्स, जिल्हा नियोजन योजनेंतर्गत मंजूर कामांची विस्तृत माहिती घेतली. अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात. वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पूर्वसूचना ग्राहकांना देण्यात यावी, सोबतच एका वाहिनीवर एका महिन्यात केवळ एकदाच आऊटेज घेण्यात यावा, या भागातील ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठ्याला प्राधान्य देण्यात यावे यासाठी उपकेंद्रांना वीजपुरवठ्यााचा अतिरिक्त स्रोताची उपलब्धता करून देण्यात यावे, सर्व उपकेंद्रे एकमेकांशी जोडण्याचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, उपकेंद्रातील अतिभारित वीज रोहित्राच्या ठिकाणी वाढीव क्षमतेची वीज रोहित्रे तात्काळ बसविण्यात यावी, सोबतच प्रलंबित वीज जोडण्या त्वरित देणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणाऱ्या भागातील बिघाडांचे विश्लेषण करून ते टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही साबू यांनी यावेळी केल्या.या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंते उमेश शहारे, दिलीप दोडके, नारायण आमझरे, मे. एसएनडीएलतर्फ़े राजेश तुरकर, दीपक लाबडे, शेषराव कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीपश्चात साबू यांनी मे. एसएनडीएलचे सेमिनेरी हिल्स उपकेंद्र, जयहिंद उपकेंद्र, ग्राहक सुविधा केंद्र कॉल सेंटर या ठिकाणी भेट देत तेथील कामांची पाहणीही केली.ग्राहक सेवा करतोय सशक्तयावेळी एसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराणा यांनी मे. एसएनडीएलच्या कामाबाबत विस्तृत सादरीकरणामार्फत कंपनीच्या एकूणच कामकाजाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. उपकेंद्रांवरील भार कमी व्हावा यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी, वीजचोरीचे आणि वीज अपघातांचे प्रमाण अधिक असलेल्या भागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ग्राहक सेवा सशक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.तर जप्त होणार बँक गॅरंटीमहावितरणने एसएनडीएलच्या वाढत्या थकीत रकमेबाबत बैठकीत तीव्र चिंता व्यक्त केली. कंपनीने स्पष्ट केले की, थकीत रक्कम वाढून १३३ कोटी रुपये झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. जर ही रक्कम १० कोटी पेक्षा कमी झाली नाही तर एसएनडीएलची बँक गॅरंटी जप्त केली जाईल, असा इशाराही यावेळी दिला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर