शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : अखेर दखलपात्र गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:57 IST

महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात अखेर कलम ३५३, ५०४, ५०६ व १८६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात अखेर कलम ३५३, ५०४, ५०६ व १८६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या ४ नोव्हेंबर रोजी महावितरणकर्मचारी मुनेश्वर कापसे व राहुल मेश्राम हे कंत्राटी वसुली कर्मचारी अक्षय परासकर यांचेसोबत भालदारपुरा येथील बडा मस्जिद परिसरातील अब्दुल्लाबेग चमूबेग या ग्राहकाकडील सुमारे १ लाख ५५ हजाराची थकबाकी असल्याने त्या घरी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या महिलेला त्यांनी थकबाकीबाबत माहिती दिली व अर्धा तास वाट बघितल्यानंतर काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तेथील वीजपुरवठा खंडित करून दुसऱ्या ग्राहकाकडे कारवाईसाठी गेले असता परवेज खान या आरोपीने या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली, याशिवाय मुनेश्वर कापसे या वीज कर्मचाऱ्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे ते खाली पडल्यानंतर त्यांना परत मारहाण करीत बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी गणेशपेठ पोलीसांनी कलम ३२३, ५०४ व ५०६ या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी दोषींविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून त्याचेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा केला, अखेर ६ नोव्हेंबर रोजी या आरोपीविरोधात शासकीय कामकाजात अडथळा करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग करणे या आरोपाखाली दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या या सहकार्याबद्दल महावितरणने त्यांचे आभार व्यक्त केले असून महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारीnagpurनागपूर