महावितरण इन, एसएनडीएल आऊट !

By Admin | Updated: May 7, 2015 02:04 IST2015-05-07T02:04:14+5:302015-05-07T02:04:14+5:30

एसएनडीएलच्या लाईन स्टाफने मंगळवारी एकाएक संप पुकारून एकप्रकारे नागपूरकरांनाच वेठीस धरले.

Mahavitaran In, SNDL Out! | महावितरण इन, एसएनडीएल आऊट !

महावितरण इन, एसएनडीएल आऊट !

नागपूर : एसएनडीएलच्या लाईन स्टाफने मंगळवारी एकाएक संप पुकारून एकप्रकारे नागपूरकरांनाच वेठीस धरले. मंगळवार व बुधवारी अर्ध्या नागपूरचा वीज पुरवठा खंडित होता. नागपूकरांना रात्र अंधारात तर दिवस ऊन्हाच्या झळांच्या गर्मीत काढावा लागला. परिणामी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत प्रशासनाकडे तक्रारही केली. या सर्वात शासकीय पातळीवर एक मोठी उलाढाल झाली. शासकीय वीज वितरण कंपनी महावितरणने आपल्या फ्रेन्चाईजी एसएनडीएलला झटका देत सिव्हिल लाईन्स विभाग अस्थायी ‘स्टेप इन’ केले आहे. आता येथील कामकाज थेट महावितरण सांभाळणार आहे.

महावितरणमध्येही संपाचा इशारा
महावितरणमध्ये सक्रिय असलेल्या वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनेसुद्धा काम रोखण्याचा इशारा दिला आहे. समितीतर्फे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, एसएनडीएलच्या कार्यक्षेत्रात पाठविण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीचे पत्र दिले जात आहे. परंतु यात हे कुणाच्या आदेशानुसार होत आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. समितीने याचा विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Mahavitaran In, SNDL Out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.