शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

नागपूर मनपात महाविकास आघाडी कठीणच; काँग्रेसची ताठर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:41 AM

Nagpur News राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर महापालिकेच्या अगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता दिसत नाही.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी म्हणते, एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक आहे हे विसरू नका

कमलेश वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर महापालिकेच्या अगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असून, नागपूर शहर काँग्रेसनेही या भूमिकेचे भक्कम समर्थन केले आहे, तर काँग्रेसच्या या ताठर भूमिकेला फारसे महत्त्व न देता राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे गेली निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होती. आता एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने आहे, हे काँग्रेसने विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसने कधीच राष्ट्रवादीला फारसे महत्त्व दिलेले नाही. २०१२ मध्ये काँग्रेसने आघाडी करीत राष्ट्रवादीला ३० जागा सोडल्या; पण राष्ट्रवादीला फक्त ६ जागा जिंकता आल्या. २०१७ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांत आघाडीसाठी तीन फेऱ्यांत चर्चा झाली. शेवटी काँग्रेसने १५१ पैकी फक्त १८ जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, राष्ट्रवादीने हा सन्मानजनक प्रस्ताव नसल्याचे सांगत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपा सोबत हात मिळविला. मात्र, २०१२ पेक्षाही वाईट निकाल लागला. राष्ट्रवादीच्या घड्याळात तीन काटेही उरले नाहीत. एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी विजय मिळवीत इज्जत राखली. आघाडी न करण्याचा फटका काँग्रेसलाही बसला. काँग्रेस २९ पर्यंत खाली घसरली. सुमारे दहा ते १२ जागांवर काँग्रेसलाही नुकसान सहन करावे लागले.

यावेळीही काँग्रेसने स्वबळाचा नारा देत ताठर भूमिका घेतली आहे. आघाडी करायची झाली तर राष्ट्रवादी अव्यवहार्य भूमिका घेते व ५० जागांपासून सुरुवात करते. यात वेळ जातो. साध्य काहीच होत नाही. शिवाय पुन्हा शिवसेनेला सोबत घेतले तर ते ३० ते ३५ जागा मागतील. या दोन्ही पक्षाला ५० टक्के जागा दिल्या तर एवढी वर्षे राबणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी समोर केला आहे. आघाडी नकोच याला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भक्कम पाठबळ दिले आहे.

चार सदस्यांचा प्रभाग विस्ताराने खूप मोठा असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांची शक्ती कमी पडत होती. मात्र, आता महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे काँग्रेसनेही भ्रमात राहू नये. राष्ट्रवादीला कमी लेखण्याची किंमत पुन्हा एकदा काँग्रेसला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.

राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार

- काँग्रेसची ताठर भूमिका पाहता राष्ट्रवादीनेही आपली रणनीती बदलली आहे. आघाडी करण्यासाठी काँग्रेससमोर लाचारी पत्करण्यापेक्षा शिवसेनेशी आपले बंधन अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तशी प्राथमिक चर्चा झाली आहे. २०१२ मध्ये भाजपशी युती करून करून लढलेल्या शिवसेनेला ६ जागा जिंकता आल्या. २०१७ मध्ये स्वबळावर लढून फक्त दोन नगरसेवक विजयी झाले. अशात राष्ट्रवादीच्या साथीने आपली विस्कटलेली घडी नीट करण्याची शिवसेनेची योजना आहे.

कार्यकर्त्यांसाठी स्वबळावरच लढणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तीच नागपूर शहर काँग्रेसची भूमिका होती. नागपुरात राष्ट्रवादीसोबत युतीच्या वाटाघाटी करतानाचे अनुभव चांगले नाहीत. शहरात काँग्रेसचा व्याप मोठा असून, प्रत्येक वॉर्डात तगडे कार्यकर्ते आहेत. महायुती करून लढलो तर सक्षम कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. त्यामुळे काँग्रेस स्वबळवरच लढेल.

- आ. विकास ठाकरे,

नागपूर शहर अध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसचेच अधिक नुकसान

- भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे. मात्र, निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात आम्ही पडलो तर आमचेही नुकसान होईल. राष्ट्रवादीला शहरात गमविण्यासारखे काहीच नाही. उलट आमचे शहरात संघटन तयार होईल; पण आघाडी नाही केली तरी काँग्रेसचेच नुकसान अधिक आहे. यावेळी निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने आहे, हे काँग्रेसने विसरू नये.

- दुनेश्वर पेठे,

शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 

मनपाच्या दोन निवडणुकीतील चित्र

पक्ष २०१२ २०१७

काँग्रेस ४३ २९

राष्ट्रवादी ०६ ०१

शिवसेना ०६ ०२

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका