यशवंत मनोहर यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 18:50 IST2022-11-25T18:49:59+5:302022-11-25T18:50:32+5:30
Nagpur News अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ' महात्मा फुले समता पुरस्कार ' यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत यशवंत मनोहर यांना जाहीर करण्यात आला आहे.

यशवंत मनोहर यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर
नागपूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ' महात्मा फुले समता पुरस्कार ' यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत यशवंत मनोहर यांना जाहीर करण्यात आला आहे.
एक लाख रूपये रोख, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. समाज, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यशवंत मनोहर यांनी शंभराहून अधिक वैविध्यपूर्ण पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांचा समावेश आहे.