शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा ऑक्सिजनपुरवठा कमी करण्याचा निर्णय दुर्दैवी; उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:14 IST

महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याऐवजी कमी करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याऐवजी कमी करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा वाढविणे अत्यंत आवश्यक होते. परंतु, केंद्र सरकारने असे न करता उफराटा निर्णय घेतला. महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा कमी केला. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सध्या नागपूर जिल्ह्याला रोज १६६.५ मेट्रिक टन तर, संपूर्ण विदर्भातील कोरोना रुग्णांना रोज एकूण २६६.५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. नागपूरमध्ये कार्यरत युनिट्सची ऑक्सिजन उत्पादन क्षमता केवळ १४६ मेट्रिक टन आहे. उर्वरित गरज भिलाई येथील प्राक्स एअरच्या पुरवठ्यामुळे पूर्ण होत होती. प्राक्स एअर रोज ११० मेट्रिक टन ऑक्सिजन देत होते. परंतु, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाद्वारे १८ एप्रिल रोजी जारी निर्णयामुळे त्यांनी हा पुरवठा ६० मेट्रिक टनांवर आणला. परिणामी, विदर्भात रोज १०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा पडत आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

यावर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्राक्स एअरकडून होणारा ऑक्सिजन पुरवठा ११० मेट्रिक टनांवरून वाढवून २०० ते ३०० मेट्रिक टन करणे आवश्यक होते. परंतु, याउलट केंद्राने दुर्दैवी निर्णय घेऊन ऑक्सिजन पुरवठा कमी केला. कोरोना रुग्णांना त्याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागत आहेत, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.

११० मेट्रिक टन पुरवठा कायम ठेवण्याचा आदेशnउच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा वादग्रस्त निर्णय निष्प्रभ करून विदर्भाला रोज केला जाणारा ११० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश प्राक्स एअरला दिले. तसेच, यादरम्यान, केंद्र सरकारकडून यासंदर्भात आवश्यक माहिती घेऊन बाजू स्पष्ट करावी, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. उल्हास औरंगाबादकर यांना बजावले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस