नागपूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपूरचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी केवळ मतदानासाठी नागपुरात आलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली.
सद्य:स्थितीतील राजकीय चित्र, २३ नोव्हेंबरनंतरची राजकीय समीकरणे आदींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुमारे २५ मिनिटांनंतर फडणवीस तेथून रवाना झाले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची कुठलीही अधिकृत माहिती संघाकडून देण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने विविध कयास लावण्यात येत आहेत.