शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

महाराष्ट्र बंदला विदर्भात 100 टक्के प्रतिसाद; बाजारपेठांसह सर्वत्र सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:24 IST

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला विदर्भात काही किरकोळ घटना वगळता शांततामय प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपरिवहन मंडळाला लाखोंचा फटकाअमरावती जिल्ह्यात मुस्लीम युवकाला मारहाणशांतता राखण्याचे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतनागपूर: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला विदर्भात काही किरकोळ घटना वगळता शांततामय प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.नागपुरात सलग दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही ठिकाणी रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. या सर्व प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण होते. मात्र, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत कुणालाही दुखापत अथवा तशी अनुचित घटना नागपुरात घडली नाही.भीमा कोरेगावमधील सोमवारच्या घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच नागपुरातील वातावरण गरम झाले. भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत तरु णांचे घोळके विविध भागात एकत्र होऊन घोषणाबाजी करीत होते. मंगळवारी दुपारपासून जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा, कमाल चौकात टायर जाळून, बसवर दगडफेक करून जमावाने आपला रोष व्यक्त केला. बुधवारी सकाळी विविध भागात मोर्चे, रॅली, टायरची जाळण्याचे प्रकार सुरू झाले. वाडी, इंदोरा, शताब्दी चौक, भीमचौक, मानेवाडा, ईमामवाडा, जयताळा भागात प्रचंड संख्येत जमाव घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत होता. शताब्दी चौक आणि वाडीत जमाव आक्र मक होत असल्याचे पाहून पोलसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची समजूत काढत परिस्थिती हाताळली. काही ठिकाणी जमावाने रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला.दरम्यान, मंगळवारी रात्री विविध भागात तणाव वाढत असल्याचे पाहून बुधवारी सकाळपासूनच पोलिसांचा शहरातील महत्वाची ठिकाणं आणि संवेदनशील भागात प्रचंड ताफा तैनात करण्यात आला होता. मदतीला राखीव दलाच्या तुकड्यांनाही बोलवून घेतले होते. तणाव किंवा आंदोलकांशी बाचाबाची होत असल्याचे पाहून वरिष्ठ अधिकारी लगेच घटनास्थळी पहचून परिस्थिती हाताळत होते. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील विविध भागात बंदचा परिणाम दिसत असला तरी तोडफोडीच्या घटनांची नोंद नव्हती.वर्धा येथे बंदचे आवाहन करणाऱ्या घोषणा देत आंबेडकरी अनुयायांनी बाजारपेठ बंद केली. रस्त्यावर टायर्स जाळण्याच्या घटनांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही अनुचित घटना घडल्या नाहीत.गडचिरोली जिल्ह्यात आंदोलनकर्ते गाड्यांवर फिरून बंदचे आवाहन करताना दिसत होते. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.चंद्रपुरात चक्काजाम व टायर जाळण्याच्या किरकोळ घटना घडल्या. बाकी जिल्ह्यात बंद शांततेत पाळण्यात आला. चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शांततेने आपला निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.अमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथे सात खाजगी वाहनांची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली. अचलपुरातही दगडफेकीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. येथील तहसील कार्यालयाजवळील दुकाने बंद करण्यासाठी दगडफेक करण्यात आली. दर्यापूर येथे एका गॅस एजन्सीचे आॅफिस फोडण्यात आले. भाजीबाजारात जाऊन भाजीची नासधूस करण्यात आली.अंजनगाव येथे आंदोलनात सहभागी झालेल्या एका मुस्लीम युवकाला आंदोलनकर्त्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. या युवकाला अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोर्शीत किरकोळ दगडफेक व टायर्स जाळण्याच्या घटना घडल्या. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी मोदींचे रस्त्यावर लागलेले पोस्टर फाडण्यात आले. चिखलदरा येथे जाणाऱ्या पर्यटकांना या रास्ता रोकोचा फटका बसल्याने परत जावे लागले.यवतमाळात बाभुळगाव येथे रास्ता रोको व टायर जाळण्याच्या घटना घडल्या. उर्वरित जिल्ह्यात बंद शांततेने पाळण्यात आला.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही बंदला शांततामय प्रतिसाद मिळाला.वर्धा लोकमत कार्यालय बंद करण्याची मागणीवर्धा येथील लोकमत कार्यालयात सकाळपासूनच दोन तीन गटांनी तरुण येऊन कार्यालय बंद करण्याची मागणी करून गेले होते. मात्र कार्यालय सुरू राहिले. दुपारच्या सुमारास तरुणांच्या एका गटाने बंद करण्याची मागणी करीत कार्यालयाच्या दिशेने दगड भिरकावले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. 

टॅग्स :agitationआंदोलन