Maharashtra Election 2019; माझ्यावर अन्याय नाही, पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:34 IST2019-10-04T16:33:58+5:302019-10-04T16:34:22+5:30
कामठी विधानसभेत भाजपने आपल्याला संधी दिली नाही. याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Maharashtra Election 2019; माझ्यावर अन्याय नाही, पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कामठी विधानसभेत भाजपने आपल्याला संधी दिली नाही. याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, मी विदर्भात पक्षासाठी काम करावे अशी पक्षश्रेष्ठीची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता. मात्र मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडील.