शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, प्रियांश खर्गेंविरोधात भाजपा आमदार आक्रमक

By मंगेश व्यवहारे | Updated: December 8, 2023 12:26 IST

Maharashtra Assembly Winter Session: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता.

- मंगेश व्यवहारेनागपूर  - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता. या वक्तव्यावरून राज्यभर राण पेटले आहे. त्याचे पडसाद आज विधानभवनातही दिसून आलेत. परिसरात भाजपच्या आमदारांनी स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ निदर्शने केली.

आंदोलनात आशिष शेलार, बंटी भांगडिया, सुनील राणे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे, राम कदम, समीर मेघे सहभागी होते. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले,‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे समस्त क्रांतीकारक आणि देशभक्तांचा अपमान आहे. हा देश त्यांचे बलिदान नाकारू शकत नाही. इंदिरा गांधी यांनी स्वत: त्यांच्या बलिदानाचे समर्थन केले होते. पण, काँग्रेस आणि खरगे वारंवार सावरकरांना बदनाम करत आहे. ते महाराष्ट्रद्रोही असून त्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी जबाब द्यावा.’

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcongressकाँग्रेसBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर