शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

लाडकी बहीण झाली जागरूक; नागपुरात महिलांच्या मतदानात आठ टक्क्यांनी वाढ

By योगेश पांडे | Updated: November 21, 2024 23:59 IST

दक्षिण, मध्य, उत्तरमध्ये घसघशीत वाढ : लाडक्या बहिणींचा महायुतीला कौल की महाविकास आघाडीला फायदा?

योगेश पांडे, नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अंतिम आकडे समोर आले असून, मागील वेळच्या तुलनेत नागपुरात ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात ६.३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाही नागपूरकरांना मतदानाचा ‘फर्स्ट क्लास’ गाठण्यात अपयश आले असले तरी महिला मात्र कमालीच्या जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. उपराजधानीत मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ७.९७ टक्क्यांनी महिलांचे मतदान वाढले आहे. आता या लाडक्या बहिणींच्या महायुतीला फायदा होणार की महाविकास आघाडीला महिलांचा कौल मिळणार याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.

‘लोकमत’ने नागपुरातील सहाही मतदारसंघातील २०१९ व २०२४ च्या केवळ ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानाची तुलना केली असता वरील बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये नागपूर शहरात ईव्हीएमद्वारे मतदान करणारे २२ लाख ९ हजार १४५ मतदार होते. त्यातील ११ लाख १९ हजार ८२५ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५३.१९ टक्के व महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४८.११ टक्के इतकीच होती. मात्र यावेळेस महिलांनी नागपुरात कमाल केली आहे. यावेळेस नागपुरात ११ लाख ७९ हजार ८१४ पैकी ६ लाख ८४ हजार २३३ पुरुषांनी मतदान केले, तर १२ लाख २ हजार ९५६ महिलांपैकी ६ लाख ७४ हजार ६१८ जणींनी ईव्हीएमवर मतदानाचे कर्तव्य बजावले. यावेळी पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५७.६० टक्के व महिलांचा टक्का ५६.०८ टक्के इतका आहे. २०१९ च्या तुलनेत पुरुषांचे मतदान ४.४१ टक्क्यांनी वाढले, तर महिलांचे मतदान ७.९७ टक्क्यांनी वाढले.

महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद

जर नागपूर शहरातील सहाही मतदारसंघाच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर उत्तर नागपुरात २०१९ च्या तुलनेत महिलांच्या मतदानात सर्वाधिक ८.७७ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल मध्य नागपूर (८.४४ टक्के), दक्षिण नागपूर (८.१६ टक्के) या मतदारसंघात मोठी वाढ झाली आहे. दक्षिण-पश्चिममध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत महिलांचे मतदान ५.९६ टक्के वाढ आहे. याशिवाय पूर्वमध्ये महिलांचे मतदान ७.९३ टक्क्यांनी वाढले.

असे आहे मतदान

दक्षिण पश्चिम नागपूरवर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान२०१९ : ५१.४१ : ४८.३३ : ४९.८७ : ५०.०२२०२४ : ५४.९२ : ५४.२९ : ५४.५९ : -

दक्षिण नागपूरवर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान२०१९ : ५२.६० : ४७.९८ : ५०.३० : ५०.६१२०२४ : ५७.८६ : ५६.१४ : ५६.९९ : -

पूर्व नागपूरवर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान२०१९ : ५५.८२ : ५०.५८ : ५३.३० : ५३.४१२०२४ : ६०.३२ : ५८.५१ : ५९.४२ : -

मध्य नागपूरवर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान२०१९ : ५४.८१ : ४६.४० : ५०.६४ : ५०.७४२०२४ : ५०.५८ : ५४.८४ : ५७.१७ : -

पश्चिम नागपूरवर्ष : पुरुष : महिला : एकूण मतदान (ईव्हीएम) : एकूण मतदान२०१९ : ५१.५३ : ४६.८९ : ४९.२४ : ४९.४१२०२४ : ५६.२६ : ५५.३१ : ५५.७८ : -

उत्तर नागपूरवर्ष : पुरुष : महिला : एकूण (ईव्हीएम) : एकूण मतदान२०१९ : ५३.१६ : ४८.३२ : ४९.९९ : ५०.९०२०२४ : ५९.०४ : ५७.०९ : ५८.०५ : -

२०१९ मधील एकूण मतदान (केवळ ईव्हीएम)एकूण : पुरुष : महिला : एकूणमतदान : ५,९५,४३६ : ५,२४,३८९ : ११,१९,८२५एकूण मतदार : ११,१९,२८१ : १०,८९,८६४ : २२,०९,१४५

२०२४ मधील एकूण मतदान (केवळ ईव्हीएम)एकूण : पुरुष : महिला : एकूणमतदान : ६,८४,२३३ : ६,७४,६१८ : १३,५८,८५१एकूण मतदार : ११,७९,८१४ : १२,०२,९५६ : २३,८२,७७०

एकूण मतदान टक्केवारी२०१९ : ५३.१९ : ४८.११ : ५०.६९२०२४ : ५७.६० : ५६.०८ : ५७.०३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाVotingमतदानnagpurनागपूर