शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
6
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
7
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
8
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
9
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
10
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
11
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
12
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
13
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
14
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
15
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
16
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
17
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
18
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
19
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
20
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:58 IST

निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले.

ठळक मुद्देदोन ठिकाणी सापडली रोकड : पाचपावली आणि सीताबर्डीत चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असतानाच, दुसऱ्या एका पथकाने गणेश टेकडी मंदिराजवळच्या मानस चौकात २५ लाखांची रोकड ताब्यात घेतली.

निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशाचा वापर होतो. काळे धनही मोठ्या प्रमाणात बाहेर काढले जाते. ते ध्यानात घेत हा गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथक, सतर्कता (एसएसटी) पथकांची नियुक्ती केली आहे. या विशेष पथकांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांचाही समावेश आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून ते वाहनांची, वाहनधारकांची तपासणी करतात. असेच एक पथक पाचपावली उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी ३.३० वाजता नाकाबंदी करीत होते. त्यांना एक स्वीफ्ट कार भरधाव वेगाने येताना दिसली. त्यात चालकासह चार व्यक्ती होते. कारची तपासणी केली असता त्यात भलीमोठी रोकड आढळली. त्यामुळे कारमधील व्यक्तींना कारसह पाचपावली ठाण्यात नेण्यात आले. ठाणेदार अशोक मेश्राम यांनी लगेच निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) तसेच प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे दोन्ही विभागाचे अधिकारी पाचपावली ठाण्यात पोहचले. त्यांनी नोटा मोजण्याची मशीनही सोबत आणली. रात्री ८ वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही रोकड ७२ लाख रुपये भरल्याचे समजते. एका राजकीय पक्षाची ही रक्कम असल्याची जोरदार चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात केली जात होती. 
दरम्यान, ही रोकड लॉजिकेश सोल्युशन कंपनीची असून, ही कंपनी वेगवेगळ्या ग्राहकांकडून रक्कम जमा करून ती बँकेत जमा करण्याची जबाबदारी पार पाडते. एटीएममध्ये रक्कम जमा करण्याचेही काम करते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज नेहमीप्रमाणे वीज मंडळाच्या कलेक्शन सेंटरवरून ही रोकड जमा केली आणि ती स्टेट बँकेच्या मुख्यालयात जमा करण्यासाठी निघाले असताना नाकाबंदीदरम्यान त्यांना पकडल्याचे काही जण पोलीस ठाण्यात सांगत होते.या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच दुसऱ्या एका पथकाने टेकडी गणेश मंदिराजवळच्या मानस चौकात आज रात्री ७ च्या सुमारास २५ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. ओला कारमधून दोन व्यक्ती ही रोकड नेत होते. त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.तीन दिवसांत एक करोड११ ऑक्टोबरला पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड पकडण्यात आली होती. अशा प्रकारे तीन दिवसांत १ कोटी रुपये सापडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MONEYपैसा